शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अधीक्षक अभियंत्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:34 AM2021-03-06T04:34:58+5:302021-03-06T04:34:58+5:30

देसाईगंज तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी या भागात विविध पिकांची लागवड केली आहे. सध्या पिकांना पाणी देण्याचे काम शेतकऱ्यांना करावे लागते; ...

Surround the Superintendent of Engineers on the questions of the farmers | शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अधीक्षक अभियंत्यांना घेराव

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अधीक्षक अभियंत्यांना घेराव

Next

देसाईगंज तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी या भागात विविध पिकांची लागवड केली आहे. सध्या पिकांना पाणी देण्याचे काम शेतकऱ्यांना करावे लागते; परंतु काही दिवसांपासून तालुक्यातील पोटगाव,कोरेगाव, विहीरगाव परिसरात ट्रान्स्फाॅर्मर ओव्हरलोड झाल्याने कृषीपंप काम करीत नाही. तालुक्यातील वारंवार वीजपुरवठा खंडित हाेत आहे. तसेच सौरऊर्जा पंप काम करीत नाही. या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ही समस्या लवकर साेडवावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंता गाडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. अभियंता गाडगे व देसाईगंजचे उपअभियंता साळवे यांनी शेतकरी बांधवांना न्याय देण्याचे आश्वासन दिले. निवेदन देताना युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, रजनीकांत मोटघरे, नंदू वाईलकर, नरेंद्र गजपुरे, शाम मत्ते, आबाजी बुल्ले, पांडुरंग मत्ते, कालिदास सहारे, दयाराम मत्ते, वसंता राऊत, रामदासजी बुल्ले, यशवंत मत्ते, हरी सहारे, चितरु गायकवाड, गजानन बुल्ले, मुरली बनपूरकर, यादव मस्के, लांजेवार, गाैरव एनप्रेड्डीवार, मयूर गावतुरे व युवक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

बाॅक्स

... तर आंदाेलन करणार

देसाईगंज तालुक्यात उच्च विद्युत दाबाची व अनियमित वीजपुरवठ्याच्या समस्येचा सामना शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. ही समस्या येत्या ८ दिवसात न साेडविण्यास तीव्र आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा युवक काॅँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंत्यांना दिला. याशिवाय जिल्ह्यात नवीन मीटर उपलब्ध नसल्याने अनेकांना नवीन कनेक्शन मिळविण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नवीन कनेक्शन लवकर उपलब्ध करावे, अशी मागणी याप्रसंगी केली.

Web Title: Surround the Superintendent of Engineers on the questions of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.