आकाशवाणी केंद्रासाठी सर्वेक्षण
By Admin | Published: September 30, 2016 01:34 AM2016-09-30T01:34:55+5:302016-09-30T01:34:55+5:30
गडचिरोली येथे आकाशवाणी केंद्र स्थापन करण्याच्या उद्देशाने पाहणी करण्यासाठी नागपूर आकाशवाणी केंद्राचे एक पथक गुरूवारी गडचिरोली येथे आले.
गडचिरोली : गडचिरोली येथे आकाशवाणी केंद्र स्थापन करण्याच्या उद्देशाने पाहणी करण्यासाठी नागपूर आकाशवाणी केंद्राचे एक पथक गुरूवारी गडचिरोली येथे आले.
गडचिरोलीत आकाशवाणी केंद्र असावे, असा प्रस्ताव माहिती व जनसंपर्क विभागाच्या सचिवांना ९ आॅगस्ट रोजी सादर केला होता. अतिदुर्गम भागात शासकीय योजनांची माहिती पोहोचविणे अडचणीचे असल्यामुळे आकाशवाणीद्वारे माहिती पोहोचविणे शक्य असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले होते. प्रस्ताव सादर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांसोबत याबाबत चर्चा केली. त्यामुळे या केंद्राच्या स्थापनेबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान कार्यालयाने याची तत्काळ दखल घेत पाहणी करण्याचे निर्देश नागपूर आकाशवाणी केंद्राला दिले. त्यानुसार नागपूर आकाशवाणी केंद्राचे सहायक अभियंता वसंत पराते यांच्यासह पथकाने जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक व माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांच्यासोबत चर्चा केली.