जखमी माकडाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:40 AM2021-09-25T04:40:10+5:302021-09-25T04:40:10+5:30

आरमोरी : जंगलात वाघाचे अस्तित्व आणि वन्य प्राण्यांना खाण्याच्या अडचणींमुळे जंगलातील माकडांचे कळप गावात येत आहेत. ब्रह्मपुरी मार्गावरील एका ...

Surviving an injured monkey | जखमी माकडाला जीवदान

जखमी माकडाला जीवदान

Next

आरमोरी : जंगलात वाघाचे अस्तित्व आणि वन्य प्राण्यांना खाण्याच्या अडचणींमुळे जंगलातील माकडांचे कळप गावात येत आहेत. ब्रह्मपुरी मार्गावरील एका राइस मिलजवळ दुचाकी वाहनाने कळपातील एका माकडाला धडक दिल्याने माकड गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सदर घटनेची माहिती वृक्षवल्ली वन्यजीव संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना माहीत होताच त्यांनी जखमी माकडाला पकडून त्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन त्याच्यावर उपचार केले.

वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष देवानंद दुमाने, सचिव दीपक सोनकुसरे, सदस्य वसीम शेख, करण गिरडकर यांनी घटनास्थळ गाठून माकडाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते अंगावर धावून चावण्याचा प्रयत्न करीत होते. तरीही या कार्यकर्त्यांनी माकडाला यशस्वीरीत्या पकडले. आरमोरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन त्याच्यावर उपचार करण्यात आले. पूर्ण बरे झाल्यानंतर त्याला त्याच्या अधिवासात सोडण्यात येणार आहे. यापूर्वी या संस्थेने घुबड, नीलकंठ पक्षी, बुलबुल, बगळे, पोपट, अजगर, घोरपड, हत्तीसरडा अशा विविध वन्यजीवांना जीवनदान दिले आहे.

Web Title: Surviving an injured monkey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.