चापलवाडाच्या ग्रामसेविकाला निलंबित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:25 AM2021-06-10T04:25:12+5:302021-06-10T04:25:12+5:30

चापलवाडा ग्रामपंचायतीमध्ये पी. एस. मसराम या कार्यरत आहेत. परंतु, ३१ मार्च २०२१ पासून त्या वैद्यकीय रजेवर गेल्या. त्यानंतर पी. ...

Suspend Chapalwada Gramsevika | चापलवाडाच्या ग्रामसेविकाला निलंबित करा

चापलवाडाच्या ग्रामसेविकाला निलंबित करा

Next

चापलवाडा ग्रामपंचायतीमध्ये पी. एस. मसराम या कार्यरत आहेत. परंतु, ३१ मार्च २०२१ पासून त्या वैद्यकीय रजेवर गेल्या. त्यानंतर पी. ए. मुलकलवार यांच्याकडे ग्रामपंचायतीचा प्रभार सोपविण्यात आला. १ जूनपासून पुन्हा मसराम या ग्रामपंचायतीमध्ये रुजू हाेण्याचा प्रयत्न करीत आहेत. येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी अरेरावीची भाषा वापरून अर्वाच्य भाषेत ‘तुम्ही कलेक्टरकडे जा. सीईओकडे जा. आमदाराकडे जा. मला कोणाचीही भीती नाही व कोणाच्या आदेशाची आवश्यकता नाही’ असे बोलून वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींचा अपमान केला. ग्रामसेविका मसराम यांच्यावर यापूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात काम करताना नेहमी गैरहजर राहणे, मासिक सभा विहीत कालावधीत न घेणे, शासकीय योजनांची अंमलबजावणी न करणे यासारखे अनेक आराेप आहेत. त्यांच्याविराेधात वारंवार तक्रारी करूनही अजूनपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. याचा परिणाम गावविकासावर हाेत आहे. त्यामुळे या ग्रामसेविकेला निलंबित करून बदली करावी, अशी मागणी सरपंच रेखा काेहपरे, उपसरपंच मनोज येलमुले, ग्रामपंचायत सदस्य नारायण भट्टलवार, यशवंत बर्लावार, ज्योती रामटेके, गीतेश कोहपरे, गंगाधर रामटेके यांनी केली आहे. निवेदनप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, प्रतीक राठी व कार्यकर्ते उपस्थित होते.

काेट...

माझ्यावर लावलेले सर्व आरोप खोटे आहेत. मी माझी सर्व कामे वेळेवर करत होते. मला टायफाॅईड, न्यूमोनिया झाला व कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे मी रजेवर गेले. जेव्हा मी ग्रामपंचायतीमध्ये हजर झाले, तेव्हा सरपंचांनी प्रभार साेपविण्यास नकार दिला. तुम्ही पुन्हा कार्यालयात आला तर तुम्हाला हात धरून बाहेर काढू व ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठाेकू, अशी धमकी दिली.

- पी. एस. मसराम, ग्रामसेविका चापलवाडा

Web Title: Suspend Chapalwada Gramsevika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.