वनपरिक्षेत्र अधिकारी तनपुरे यांना सेवेतून निलंबित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:39 AM2021-04-28T04:39:25+5:302021-04-28T04:39:25+5:30

या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. वनपरिक्षेत्राधिकारी तनपुरे यांनी ५६ लाख ८६ हजार ६१७ रुपयांच्या विकासनिधीची अफरातफर केल्याचे ...

Suspend Forest Range Officer Tanpure from service | वनपरिक्षेत्र अधिकारी तनपुरे यांना सेवेतून निलंबित करा

वनपरिक्षेत्र अधिकारी तनपुरे यांना सेवेतून निलंबित करा

Next

या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. वनपरिक्षेत्राधिकारी तनपुरे यांनी ५६ लाख ८६ हजार ६१७ रुपयांच्या विकासनिधीची अफरातफर केल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये बुद्धविहार काेटरी या पर्यटन स्थळाच्या विकासकामासाठी एकूण ७४ लाख २० हजार १२२ रुपयांचा विकासनिधी मंजूर करून ताे वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय घाेटकडे वळता केला. वनपरिक्षेत्राधिकारी तनपुरे यांनी मार्च २०१८ मध्ये विकासकामे करताना माेठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. तसेच शासकीय रकमेची अफरातफर केल्यामुळे त्यांची चाैकशी करण्यात यावी, अशी तक्रार काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. डाॅ. नामदेव उसेंडी व आपण प्रशासनाकडे केली हाेती. दरम्यान नियाेजन विभागाच्या त्रिसदस्यीय चाैकशी समितीने फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रत्यक्ष चाैकशी केली. यात अफरातफर केल्याचे दिसून आले, असे भडके यांनी म्हटले आहे.

Web Title: Suspend Forest Range Officer Tanpure from service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.