ग्राम सचिवास निलंबित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 11:55 PM2017-10-15T23:55:19+5:302017-10-15T23:55:31+5:30

ग्रामपंचायत पेटतळा येथे १० आॅक्टोबरला खास ग्रामसभाचे आयोजन करण्यात आले. तेंदुपत्ता संकलन करण्याकरिता सन २०१८ करिता पर्याय क्र. १ व २ च्या निवडीकरिता ग्रामसभा घेण्यात आली.

Suspend village secretariat | ग्राम सचिवास निलंबित करा

ग्राम सचिवास निलंबित करा

Next
ठळक मुद्देपत्रकार परिषद : ग्रामसभेची अवमानना केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : ग्रामपंचायत पेटतळा येथे १० आॅक्टोबरला खास ग्रामसभाचे आयोजन करण्यात आले. तेंदुपत्ता संकलन करण्याकरिता सन २०१८ करिता पर्याय क्र. १ व २ च्या निवडीकरिता ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेनंतर ग्रामसेवकांनी आपल्या मनमर्जीने प्रोसिडिंग लिहून ग्रामसभेचा अवमान केला आहे. अशा ग्रामसेवकाची सखोल चौकशी करून निलंबित करावे, अशी मागणी नागरिकांनी पेटतळा येथे आयोजित पत्रकार परिषदेतून केली.
१० आॅक्टोबरच्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी रमेश कन्नाके होते. पेसा कायदा २०१५ पासून आजपर्यत ग्रामसभेने नामंजूर केल्याने पेसा अतंर्गत पर्याय क्र. १ व २ निवडीकरिता ग्रामसभेने बहुमताने तेंदुपत्तासंकलन करण्याकरिता नामंजूर केले. तसेच वनविभागाच्या वतीने पूर्वीप्रमाणेच २०१८ चे तेंदुपत्ता संकलन पूर्ववत केल्यास गावात वादविवाद संपुष्ठात येईल यामुळे पर्याय क्र. १ व २ नाकारून वनविभागाची फळी सुरू करण्यासाठी ठराव पारित करून ठराव मंजूर करण्यात आला. ग्रामसभा सुरु असतांना बारिक पाऊस आल्याने ग्रामसभेची प्रोसिडिंग दुसºया दिवशी सरपंचांच्या दबावात येऊन लिहिली. त्यांनी आदिवासीची बाजू धरून प्रोसिडिंग लिहीले असल्याने मी सभेचा अध्यक्ष असून नागरिकांच्या बहुमताचा ठराव सचिवाने न लिहल्याने ठरावावर सही करण्यास नकार दिला, असे रमेश कन्नाके यांनी पेटतळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. ग्रामसभेत बहुमताने पर्याय क्र १ व २ नाकारून वन विभागाच्या वतीने पूर्वीप्रमाणे नॉनपेसा फळी सुरू करावी सुरू करावी, असा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. व सदर माहिती घोट येथे माध्यमांना देण्यात आली. यात कोणाचीही दिशाभूल केली नाही. तसेच यापूर्वी २ आॅक्टोबरला झालेल्या ग्रामसभेत नागरिकांतून सभेचा अध्यक्ष न निवडता सरपंचाना सभेचा अध्यक्ष म्हणून सचिवाने स्वत:च निवड केल्याने वाद निर्माण झाला. त्यानंतर चामोर्शी येथे सचिवाच्या तक्रारीनंतर १० आॅक्टोबरला ग्रामसभा घेण्यात आली या सभेत रमेश कन्नाके यांची सभेच्या अध्यक्षस्थानी निवड करण्यात आली. परंतु सभेत बहुमताचा ठराव न लिहिल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामसेवक कोडाप नेहमी कोºया प्रोसिडिंगवरती ग्रामसभा सदस्यांच्या सह्या घेतात व त्यानंतर मर्जीने प्रोसिडिंग लिहितात, असा आरोप नागरिकांनी पत्रकार परिषदेत केला. यापूर्वी सचिव कोडाप यांची लेखी तक्रार संवर्ग विकास अधिकारी चामोशी यांचेकडे करण्यात आली असून सचिवांच्या वागणुकीमुळे नागरिक त्रस्त असून त्यांची सखोल चौकशी करून तत्काळ निलंबीत करावे, अन्यथा गावकºयांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा माजी सरपंच रमेश कन्नाके, ग्रामपंचायत सदस्य ओमप्रकाश बर्लावार, दिलीप मुसेदीवार , प्रकाश तोकलवार, पंकज तुंकलवार, आनंदराव चौधरी, वामन बर्लावार, वासुदेव तुंकलवार यांनी पत्रकार परिषदेतून दिला.

Web Title: Suspend village secretariat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.