नक्षल्यांकडून सलग दुस-या दिवशी हत्या, पोलीस खब-या असल्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 05:41 AM2017-11-23T05:41:23+5:302017-11-23T05:41:33+5:30
धानोरा (गडचिरोली) : तालुक्यातील चवेला ग्रामपंचायतीअंतर्गत येणाºया रानवाही येथील जादो पांडू जांगी (५२) यांना अपहरण करून नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या सीमेत नेले.
धानोरा (गडचिरोली) : तालुक्यातील चवेला ग्रामपंचायतीअंतर्गत येणाºया रानवाही येथील जादो पांडू जांगी (५२) यांना अपहरण करून नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या सीमेत नेले. त्यानंतर मंगळवारी रात्री बेदम मारहाण करीत त्यांची हत्या केली. सोमवारीही नक्षल्यांनी एका ग्रामस्थाची हत्या केली होती. सलग दुसºया दिवशी घडलेल्या या प्रकारामुळे प्रचंड दहशत पसरली आहे.
धानोरा तालुका मुख्यालयापासून १५ किमीवरील रानवाही गावातील जादो जांगी रात्री ११च्या सुमारास घरी झोपलेले असताना २० पेक्षा अधिक सशस्त्र नक्षलवादी तिथे आले. त्यांनी जांगी यांना उचलून नेले.
तीन किमीवरील कठाणी नदी पार करून नक्षलवादी छत्तीसगड सीमेत शिरले. तिथे जांगी यांना मरेपर्यंत मारहाण करण्यात आली. त्यानंतर मृताच्या खिशात एक चिठ्ठी ठेऊन नक्षलवादी निघून गेले. जांगी कुटुंबीयांना जंगलात सकाळी त्यांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.
जादो पोलिसांचे खबरे होते. त्यांच्यामुळेच पोलिसांनी फायरिंग केले. म्हणूनच त्यांची हत्या केल्याचे जादो यांच्या खिशातील चिठ्ठीत म्हटले आहे.
स्मरणार्थ स्मारक उभारणी
येलचिल पोलीस मदत केंद्रातर्फेआदिवासी नागरिकांसाठी विविध उपक्र म राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून २००९ मध्ये नक्षल्यांनी हत्या केलेल्या कल्लेम येथील रैनु गुम्मा आत्राम यांच्या स्मरणार्थ गावातच स्मारक उभारण्यात आले. या स्मारकाची पूजा मृताची पत्नी व मुलांच्या हस्ते करण्यात आली.