संशोधनात स्थिरता व पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:13 AM2021-08-02T04:13:48+5:302021-08-02T04:13:48+5:30
महात्मा गांधी कला, विज्ञान आणि स्व.न. पं. वाणिज्य महाविद्यालय आरमोरी येथे आयोजित ‘इंटलेक्चुअल प्राॅपर्टी राइट्स आणि रिसर्च मेथेडॉलॉजी’ या ...
महात्मा गांधी कला, विज्ञान आणि स्व.न. पं. वाणिज्य महाविद्यालय आरमोरी येथे आयोजित ‘इंटलेक्चुअल प्राॅपर्टी राइट्स आणि रिसर्च मेथेडॉलॉजी’ या विषयावर आयोजित एकदिवसीय ऑनलाइन राष्ट्रीय परिषदेत बीजभाषक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.लालसिंग खालसा हाेते. यावेळी गोंडवाना विद्यापीठातील वाणिज्य विभागाचे सहायक प्रा.डॉ.देवदत्त तारे साधनव्यक्ती म्हणून सहभागी झाले. डॉ.एम.एम. बेटकर यांनी आय.पी.आर. अंतर्गत नोंदणी प्रक्रिया, पेटंट फायलिंग, कॉपी राइट्स, ट्रेडमार्क, ट्रेड सिक्रेट, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर शोधनिबंध प्रकाशित करण्यासाठी इम्पॅक्ट फॅक्टरची असणारी विश्वसनीयता, संशोधन प्रक्रियेतील पीअर रिव्ह्यू दर्जा, यावर अभ्यासपूर्ण व विस्तृत माहिती दिली. साधनव्यक्ती डॉ.देवदत्त तारे यांनी सन २००९ नंतर यूजीसीनुसार संशोधनाच्या सुधारित नियमानुसार संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संशोधनाच्या मार्गदर्शक नियमांचा अवलंब करून, अत्यंत शिस्तबद्ध रीतीने शोधप्रबंध सादर करावेत, असे आवाहन केले. परिषदेचे प्रास्ताविक व संचालन प्रा.डॉ.सतीश कोला, तर आभार प्रा.डॉ.नरेश बन्सोड यांनी मानले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.नरेश बन्सोड, उपप्राचार्य डॉ.चंद्रकांत डोर्लीकर, प्रा.नोमेश मेश्राम, प्रा.सुनील चुटे, डॉ.छगन मुगमोडे, डॉ.विजय रैवतकर यांनी परिश्रम घेतले.
बाॅक्स
संशाेधनासंबंधी शंकांचे निरसन
या परिषदेत महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक, पदवी व पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सहभागींनी संशोधनाच्या संबंधी विविध प्रश्न आणि शंका विचारल्या. साधनव्यक्तींनी समाधानकारक उत्तरे दिली व विविध शंका आणि प्रश्नांचे निरसन केले.