प्रकल्प स्पर्धेत गाेंडवाना सैनिकी शाळेचे सुयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:45 AM2020-12-30T04:45:30+5:302020-12-30T04:45:30+5:30
गडचिराेली : मराठी विज्ञान परिषद, गडचिरोली विभागातर्फे प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन जयंतीप्रित्यर्थ राष्ट्रीय गणित दिन कार्यक्रमानिमित्त जिल्हास्तरीय ...
गडचिराेली : मराठी विज्ञान परिषद, गडचिरोली विभागातर्फे प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन जयंतीप्रित्यर्थ राष्ट्रीय गणित दिन कार्यक्रमानिमित्त जिल्हास्तरीय गणित प्रतिकृती स्पर्धा ही ऑनलाईन स्वरूपात घेण्यात आली. यात गाेंडवाना सैनिकी विद्यालयाचा विद्यार्थी हर्ष उके यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत एकूण दोन गट करण्यात आले होते. अ गट- वर्ग ५ ते ८ व तर ब गट- वर्ग ९ ते १२ अशा दाेन गटात स्पर्धा पार पडली. गणितावर आधारीत/ गणित प्रदर्शन सोडविण्यासाठी उपयुक्त/ गणि प्रयोग करण्यासाठी उपयुक्त अशी प्रतिकृती बनवून मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून स्वतः सादरीकरण करायचे होते 2 ते 3 मिनीटांचा विडीओ तयार करून यु-ट्यूब सुंदर चैनलवर अपलोड करुन्, घ्यावयाचे होते यामध्ये गोंडवाना सैनिकी विद्यालयचा विद्यार्थि हर्ष महेश उके याने या स्पर्धा सुंदर असं गणित प्रकल्प् तयार करून ऑनलाईन सादर केले होते त्याच्या या उपक्रमाला पहिल्या गटातून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. विजेत्या विद्यार्थ्याला बक्षीस व प्रमाणपत्र देऊन स्कूल ऑफ स्कॉलर्स येथे सन्मानित करण्यात आले. विजयाबद्दल हर्षचे शाळेचे मुख्याध्यापक संजीव गाेसावी, उपमुख्याध्यापक ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे आदींनी काैतुक केले आहे.