सीआरपीएफ कॅम्पमध्ये स्वच्छतेची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 10:31 PM2018-12-03T22:31:53+5:302018-12-03T22:32:09+5:30
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १९२ बटालियनच्या वतीने येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये स्वच्छतेची शपथ घेण्याचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. दरम्यान सीआरपीएफ अधिकारी व जवानांनी स्वच्छतेची शपथ घेऊन संपूर्ण भारत देशाला स्वच्छ बनविण्याचा संकल्प केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १९२ बटालियनच्या वतीने येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये स्वच्छतेची शपथ घेण्याचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. दरम्यान सीआरपीएफ अधिकारी व जवानांनी स्वच्छतेची शपथ घेऊन संपूर्ण भारत देशाला स्वच्छ बनविण्याचा संकल्प केला.
याप्रसंगी प्रामुख्याने सीआरपीएफ १९२ बटालियनचे कमांडंट जियाऊ सिंह, द्वितीय कमान अधिकारी कुलदीप सिंह खुराणा, उपकमांडंट संध्या राणी, चिकित्सा अधिकारी रवीकिरण दिघाडे यांच्यासह बटालियनचे इतर जवान उपस्थित होते. याप्रसंगी कमांडंट जिआऊ सिंह यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देऊन सीआरपीएफ कॅम्प परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन केले. स्वच्छ भारताची निर्मिती होण्यासाठी सीआरपीएफ जवानांचे सहकार्य आवश्यक आहे, असे सांगितले.
याप्रसंगी सीआरपीएफचे सर्व अधिकारी व जवानांनी स्वच्छता राखण्याची शपथ घेतली. तसेच भारत देशाला सर्वदृष्टीने स्वच्छ बनविण्याची शपथ घेतली. अशा प्रकारच्या स्वच्छतेचा कार्यक्रम सीआरपीएफ कॅम्प असलेल्या धानोरा व इतर ठिकाणीही घेण्यात आला.