सांस्कृतिक परंपरेचे प्रतिक टिप्पागड यात्रा महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 10:11 PM2018-01-29T22:11:55+5:302018-01-29T22:12:36+5:30

महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यात असलेले टिप्पागड हे धार्मिक पर्यटनस्थळ भाविकांसह सर्वांसाठीच एक आकर्षण आहे.

The symbol of cultural tradition is the Tippagad Yatra Festival | सांस्कृतिक परंपरेचे प्रतिक टिप्पागड यात्रा महोत्सव

सांस्कृतिक परंपरेचे प्रतिक टिप्पागड यात्रा महोत्सव

googlenewsNext
ठळक मुद्दे३० व ३१ जानेवारीला कार्यक्रम : छत्तीसगड सीमेवरील निसर्गरम्य ठिकाणी जमणार हजारो भाविक

हरिश सिडाम ।
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यात असलेले टिप्पागड हे धार्मिक पर्यटनस्थळ भाविकांसह सर्वांसाठीच एक आकर्षण आहे. टिप्पागड हे दोन राज्यांची सांस्कृतिक परंपरा जपणारे ठिकाण आहे. तत्कालीन राजे पुरमशहा यांनी कोरचीपासून ५७ किमी अंतरावरील पहाडावरील या स्थळाला प्रकाशझोतात आणले. तेव्हापासून तिथे यात्रेची परंपरा कायम आहे. यावर्षी ३० व ३१ जानेवारीला भरणाºया यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत.
चंद्रपूरचा पाचवा राजा बाबाजी बल्लाळशहा यांच्या काळात इ.स.१५७२ ते १५९७ यादरम्यान या गडावर पुरमशहा राजाचे राज्य होते. ‘कोटगूल’ या जमीनदारी स्थळापासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर टिप्पागड हे ठिकाण आहे. राजाला राज्यकारभार चालविण्यासाठी व शत्रूचा मुकाबला करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे हे गडस्थळ आहे. गडचिरोली, अहेरी प्रांतातील १६ जमिदाºयांपैकी व दुर्ग (राजनांदगाव) प्रांतातील चार जमीनदाºयांपैकी कोटगूल हे एक जमीनदारीचे ठिकाण. टिप्पागडचा किल्ला समुद्रसपाटीपासून २५०० ते ३००० फूट उंचीवर आहे. या गडाच्या उत्तर-पूर्वेस ‘न्याहाळकल’, पश्चिमेस ‘खोब्रामेंढा’, उत्तरेस ‘गोडरी’, कोटगुल व दक्षिणेस ‘तलवारगड’ ही गावे आहेत. गडाच्या शिखरावर चढून पश्चिमेस व दक्षिणेस नजर टाकल्यास डोंगराच्या सुंदर रांगा मनाला भुरळ घालतात. गडाच्या सभोवताल दगडाचा तट बांधलेला आहे. गडावर चढण्यासाठी पूर्वेकडून पायºया आहेत. गडावरून खाली उतरण्याचा आतून मार्ग आहे. मुख्य द्वाराला आज गुरु बाबाची गुंफा म्हणतात. गडाच्या मध्यभागी तलाव आहे. तलावालगत हनुमानाची मूर्ती व संतोषी मातेचे मंदिर आहे. या मंदिराला जयश्री मडकुटी मातेचे मंदिर म्हणतात.
टिप्पागडचा तलाव राजा पुरमशहा व राणी यांच्या प्रेमाच्या आख्यायिकेवरून श्रद्धाळूंसाठी, प्रेमी युगलांसाठी पवित्र प्रेमाचे प्रतीक मानले जाते.
गेल्या अनेक वर्षांपासून टिप्पागडला धार्मिक उत्सव होतो. माघ पौर्णिमेला दूरदूरचे यात्रेकरू मोठ्या उत्साहाने येतात. महाराष्ट्र व छत्तीसगड या दोन राज्यांच्या सीमावर्ती गडावर दोन्ही राज्यातून जनसमुदाय दरवर्षी येतात. दोन दिवस या ठिकाणी उत्सव असतो.
यावर्षी ३० व ३१ जानेवारी रोजी दिवस-रात्र भजन, पूजन व सांस्कृतिक कार्यक्र म होतात. या उत्सवात दोन राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडते.
शासनाकडून दुर्लक्षित
गडावर चढण्यासाठी रस्त्याची व पायऱ्यांची नितांत आवश्यकता आहे. गडाच्या तटाच्या दुरु स्तीची गरज आहे. रमणीय स्थळांवर बांधकाम करण्याची, वीज, पाणी तथा अन्य सोयीसुविधांची गरज आहे. शासनाने याकडे लक्ष दिल्यास नागरिकांसाठी सुंदर पर्यटन तथा धार्मिक स्थळ म्हणून येथे गर्दी आणखी वाढू शकते. निसर्गरम्य पर्यटन स्थळ, गड, किल्ले, धार्मिक स्थळ हे प्रांताचे नव्हे राज्याचे सांस्कृतिक वैभव आहे.

Web Title: The symbol of cultural tradition is the Tippagad Yatra Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.