एमएचटी-सीईटीत प्रतीक काळे जिल्ह्यात प्रथम

By admin | Published: June 2, 2016 02:52 AM2016-06-02T02:52:55+5:302016-06-02T02:52:55+5:30

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबईतर्फे घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला.

The symbol in the MHT-CET is the first in Kale district | एमएचटी-सीईटीत प्रतीक काळे जिल्ह्यात प्रथम

एमएचटी-सीईटीत प्रतीक काळे जिल्ह्यात प्रथम

Next

शिवाजी महाविद्यालयाचा वर्चस्व कायम : गुणवंतांचा संस्थेतर्फे गौरव
गडचिरोली : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबईतर्फे घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत गडचिरोली येथील शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रतीक काळे याने २०० पैकी १८६ गुण प्राप्त करून गडचिरोली जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाने इयत्ता १२ वीच्या निकालाच्या यशानंतर एमएचटी-सीईटी परीक्षेत आपले वर्चस्व कायम राखले आहे.
शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रियंका भांडेकर हिने १७९, निकिता कुरूकवार १७५, मयुरी किटे १६६, अमृत झोडगे १६४, शुभांगी येलमुले १५५, शुभांगी आरवेली १५४ व प्रतीक्षा जाधव हिने १६२ गुण प्राप्त केले. तसेच अंकुश म्हशाखेत्री १६४, प्रणीत उडाण १५२, सौरभ तुरे याने १४९ गुण प्राप्त करून यश मिळविले. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल म्हशाखेत्री, उपाध्यक्ष के. के. भोयर यांच्या हस्ते महाविद्यालयात या गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव देवराव म्हशाखेत्री, सहसचिव डी. एन. चापले, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य जी. एम. दिवटे, उपमुख्याध्यापिका वंदना कनपुरवार, पर्यवेक्षक डी. के. उरकुडे आदींसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशासाठी संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबईतर्फे एमएचटी-सीईटी परीक्षा घेतली जाते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: The symbol in the MHT-CET is the first in Kale district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.