नागपूर कराराची गडचिरोली जिल्ह्यात प्रतिकात्मक होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 09:58 PM2020-09-29T21:58:54+5:302020-09-29T22:00:30+5:30

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सोमवारी चामोर्शी, कुरखेडा व एटापल्ली येथे नागपूर कराराची होळी करीत स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, अशी मागणी केली.

Symbolic Holi of Nagpur Agreement in Gadchiroli District | नागपूर कराराची गडचिरोली जिल्ह्यात प्रतिकात्मक होळी

नागपूर कराराची गडचिरोली जिल्ह्यात प्रतिकात्मक होळी

Next
ठळक मुद्देचामोर्शी, कुरखेडा व एटापल्ली येथे आंदोलनविदर्भ राज्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सोमवारी चामोर्शी, कुरखेडा व एटापल्ली येथे नागपूर कराराची होळी करीत स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, अशी मागणी केली.
पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी २८ सप्टेंबर १९५३ रोजी पुढाकार घेत नागपूर करार केला होता. या करारांतर्गत विदर्भाला महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आले. या करारामुळे विदर्भातील जनतेला न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र करारातील अटींचे राज्य शासनामार्फत पालन करण्यात आले नाही. त्यामुळे विदर्भावर अन्याय झाला. याचा निषेध करण्यासाठी एटापल्ली व कुरखेडा येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पुढाकाराने नागपूर कराराची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. कुरखेडा येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकूर, उपाध्यक्ष घिसू खुणे, तालुका समन्वयक भागचंद टहलानी, तालुका सचिव रामचंद्र रोकडे, महिलाध्यक्ष हेमलता भैसारे, युवा आघाडी अध्यक्ष ज्ञानचंद सहारे, शहराध्यक्ष मुक्ताजी दुर्गे, उपाध्यक्ष नितेश कन्नाके, राजीराम पात्रीकर, किसनलाल सहाळा, महारू कुमरे, सेवाराम ठेला, ठाकुराम कोसरे, कृष्णा नाईक, बुधराम सहाळा, बेबीसिंग ठेला, तल्लीराम नैताम, राहूल मुंगनकर, खेमचंद सयाम, प्रमोद कन्नाके उपस्थित होते.
एटापल्ली येथे तालुका शाखेचे कोषाध्यक्ष सचिन मोतकुरवार, शरीफ शेख, प्रजोत बाल्लेलवार, ओमकार पुज्जलवार, उमेश उसेंडी, संतोष पुंगाटी, किशोर चनकापुरे, राजेश नालतीगलवार, रवी रामगुंडेवार, कुणाल मुलकावार उपस्थित होते.
चामोर्शी येथे समितीचे जिल्हाध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, उपाध्यक्ष यश राजापुरे, तालुकाध्यक्ष कृष्णा नैताम, रामचंद्र वरवाडे, विनोद पेशट्टीवार, गजू तुम्पल्लीवार, पगुजी कवटवार, शुभम भोयर, राहूल गेडाम, आकाश वर्मा, मोतीराम लाटेलवार, बंटी याकुलवार आदी उपस्थित होते.

Web Title: Symbolic Holi of Nagpur Agreement in Gadchiroli District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.