देलोडा परिसरात वाघाची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 10:15 PM2019-03-04T22:15:51+5:302019-03-04T22:16:05+5:30

पोर्लापासून सहा किमी अंतर असलेल्या देलोडा परिसरात वाघाचे दर्शन काही नागरिकांना झाले आहे. त्यामुळे नागरिक भयभित झाले आहेत. वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.

Tailor panic in Deloda area | देलोडा परिसरात वाघाची दहशत

देलोडा परिसरात वाघाची दहशत

Next
ठळक मुद्देअनेकांना दर्शन : बंदोबस्ताची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पोर्लापासून सहा किमी अंतर असलेल्या देलोडा परिसरात वाघाचे दर्शन काही नागरिकांना झाले आहे. त्यामुळे नागरिक भयभित झाले आहेत. वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.
पोर्ला ते देलोडा गावापर्यंत घनदाट जंगल आहे. देलोडाच्या पलिकडे अनेक गावे आहेत. या गावातील नागरिकांना याच रस्त्याने जावे लागते. मात्र देलोडा परिसरात अधूनमधून वाघाचे दर्शन होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही देलोडा परिसरात वाघाने दहशत निर्माण केली होती. देलोडा येथील शेतकऱ्यांचे बैल ठार केले होते. पुन्हा वाघाने बस्तान मांडल्याने जीवितहानी होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. पोर्ला ते देलोडा मार्गावरून रात्रंदिवस वाहनांची वर्दळ राहते. वाहनधारकावरही हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शक्य तितक्या लवकर वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Tailor panic in Deloda area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.