लाेकप्रतिनिधींना विश्वासात न घेणाऱ्या बीडीओवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:41 AM2021-07-14T04:41:59+5:302021-07-14T04:41:59+5:30
निवेदनात म्हटले आहे की, बीडीओ तेलंग ह्या ग्रामपंचायतस्तरावर स्वमर्जीतील काही ग्रामसेवकांना हाताशी धरून नियमबाह्य कामे करण्यास बाध्य करतात. स्थानिक ...
निवेदनात म्हटले आहे की, बीडीओ तेलंग ह्या ग्रामपंचायतस्तरावर स्वमर्जीतील काही ग्रामसेवकांना हाताशी धरून नियमबाह्य कामे करण्यास बाध्य करतात. स्थानिक लोकप्रतिनिधींची तक्रार आल्यास त्यांना बेजबाबदारीने वागणूक देऊन अप्रत्यक्षपणे त्यांचा अपमान करतात. कसल्याही प्रकारची चौकशी न करता मर्जीतील ग्रामसेवकांची बाजू घेऊन चौकशीचे बनावट व खोटे अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठविले जातात. गटविकास अधिकारी यांच्याविषयी संपूर्ण तालुक्यातील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये रोष आहे.
ग्रामपंचायत गोठणगावच्या चौकशीसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समिती नेमून चौकशी करण्याचे आदेश दिले हाेते. त्याअनुषंगाने चौकशी अहवालात पदाधिकाऱ्यांनी केलेले आरोप सत्य असूनसुद्धा गटविकास अधिकारी यांनी चुकीचा अहवाल सादर करून ग्रामसेवकांची बाजू लावून धरल्याची बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे बेजबाबदार बीडीओ तेलंग यांची चाैकशी करून निलंबित करावे, अन्यथा जि.प. व पं. स. सदस्यांच्या वतीने तीव्र आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा सभापती हलामी व पदाधिकाऱ्यांनी दिला.
120721\12gad_1_12072021_30.jpg
जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदन देताना सभापती हलामी व अन्य.