बेराेजगारांची फसवणूक करणाऱ्या कंपनीवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:35 AM2021-01-20T04:35:56+5:302021-01-20T04:35:56+5:30

गडचिराेली : गडचिराेली जिल्ह्यात अथर्व ॲग्राेकेअर प्रा. लि.कडून डिपाॅझिट स्वरूपात पैसे घेऊन नाेकरी देण्याचे आमिष दाखविण्यात आले. मात्र, सर्व ...

Take action against a company that defrauds the unemployed | बेराेजगारांची फसवणूक करणाऱ्या कंपनीवर कारवाई करा

बेराेजगारांची फसवणूक करणाऱ्या कंपनीवर कारवाई करा

Next

गडचिराेली : गडचिराेली जिल्ह्यात अथर्व ॲग्राेकेअर प्रा. लि.कडून डिपाॅझिट स्वरूपात पैसे घेऊन नाेकरी देण्याचे आमिष दाखविण्यात आले. मात्र, सर्व प्रक्रिया पार पाडून नाेकरी न मिळाल्याने फसवणूक झालेल्या बेराेजगार युवकांनी माजी आ. डाॅ. नामदेव उसेंडी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. २९ जून २०१९ राेजी तालुका समन्वय २४ पदे व ग्रामसमन्वयकाच्या ७२ पदांसाठी भरती प्रक्रियेची जाहिरात काढण्यात आली हाेती. ही पदे भरण्यात आली. मात्र, प्रत्यक्ष सुशिक्षित बेराेजगारांना कामावर घेण्यात आले नाही. सुशिक्षित युवक बेराेजगारांकडून तालुका समन्वयक पदांसाठी ३० हजार रुपये व ग्रामसमन्वयक पदासाठी ५० ते ६० हजार रुपये डिपाॅझिट स्वरूपात घेण्यात आले. डिपाॅझिट घेण्याची काेणतीही तरतूद नसताना रक्कम घेऊन बेराेजगारांची फसवणूक करण्यात आली. आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सुशिक्षित बेराेजगारांनी केली आहे. निवेदन देताना क्रिष्णा ताराम, विशाल टेकाम, ललित सरदारे, दिगांबर माेहुर्ले, राेशन निखाडे, अंबरशाहा नराेटे, निर्मला नराेटे, दसरू गावडे, साेनाली वाकडे, गुलछबू वाकडे, आशिष मेश्राम, वनिता किरंगे, कवेश दुदलवार, संदीप जागनिक हजर हाेते.

Web Title: Take action against a company that defrauds the unemployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.