अधिक तीव्रतेने ध्वनिक्षेपके वाजविणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:32 AM2021-02-15T04:32:18+5:302021-02-15T04:32:18+5:30

फेब्रुवारी, मार्च व एप्रिल महिन्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षा असतात. दरम्यान, याच कालावधीत विविध समारंभ असतात. कार्यक्रमातदरम्यान विनाकारण व केवळ देखावा ...

Take action against loudspeakers | अधिक तीव्रतेने ध्वनिक्षेपके वाजविणाऱ्यांवर कारवाई करा

अधिक तीव्रतेने ध्वनिक्षेपके वाजविणाऱ्यांवर कारवाई करा

Next

फेब्रुवारी, मार्च व एप्रिल महिन्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षा असतात. दरम्यान, याच कालावधीत विविध समारंभ असतात. कार्यक्रमातदरम्यान विनाकारण व केवळ देखावा करण्यासाठी व अज्ञानामुळे एकेक किंवा दोन दिवस उंचावर भोंगे बांधून अनावश्यकरीत्या ध्वनिक्षेपके वाजविले जातात. त्यामुळे विद्यार्थी, आजारी व्यक्ती, वृद्ध व्यक्तींना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. आरमोरी तालुक्यात वैरागड हे गाव तालुका मुख्यालयानंतर सर्वांत मोठे गाव आहे. या गावात एक-दोन दिवस आड खासगी, सार्वजनिक कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमासाठी उंचावर भोंगे बांधून गाणी वाजविली जातात. अशावेळी विद्यार्थ्यांना त्रास होतो. श्रीमंत व्यक्ती आपल्या मुलांना शहरात शिक्षण देऊ शकतात. परंतु गरिबाची मुले गावात राहूनच शिक्षण घेतात. अशा स्थितीत ग्रामीण भागात ध्वनिप्रदूषणामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेते. या सर्व बाबींचा विचार करून आयाेजकांना उंचावर भोंगे लावण्याची परवानगी देऊ नये. कायदा माेडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पालक अभिजित तावडे, प्रतीक आत्राम, शुभम सोमनकर, अभिषेक मडावी, अक्षय खोब्रागडे, मुनेश्वर मडावी, सुरेश दुमाने, गुलाब मेश्राम, रिजवान सायानी, प्रमोद ढोंगे, वैभव खोब्रागडे, प्रेमानंद तागडे, नयन हर्षे, पंकज बोडणे, प्राजक्त भालेराव, हरेश सहारे, विनोद धारगावे, राजू कांबळे, अंकित बोधनकर यांच्यासह इतर पालक व विद्यार्थ्यांनी केली आहे.

Web Title: Take action against loudspeakers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.