चुकीच्या पद्धतीने जनावरांचा लिलाव करणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:43 AM2021-08-20T04:43:13+5:302021-08-20T04:43:13+5:30
गडचिराेली नगर परिषदेने ३५ जनावरांना पकडून लांजेडा येथील कोंडवड्यात टाकले होते. यानंतर १२ ऑगस्ट रोजी जनावरांचा लिलाव करण्यात आला; ...
गडचिराेली नगर परिषदेने ३५ जनावरांना पकडून लांजेडा येथील कोंडवड्यात टाकले होते. यानंतर १२ ऑगस्ट रोजी जनावरांचा लिलाव करण्यात आला; परंतु ही जनावरे कसायांना विकण्यात आल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. घटनेबाबत परिसरातील नागरिकांनी संतापही व्यक्त केला. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी संस्थेने केली आहे.
बाॅक्स
या प्रश्नांची हवी चाैकशी
माेकाट जनावरे कोणत्या दिवशी कोंडवाड्यात टाकण्यात आली, जनावरांचा लिलाव किती दिवसांनी करण्यात आला, लिलाव करण्यापूर्वी दवंडी, नोटीस किंवा कोणाला माहिती देण्यात आली का, जनावरांची आरोग्य तपासणी करण्यात आली का, लिलावात शेतकरी किंवा पशुपालकांनी सहभाग घेतला काय, लिलावात सहभागी व्यक्तींनी रात्रीच्या सुमारास जनावरांना टेम्पोमध्ये भरून का नेले, जनावरांना वाहून नेण्याची परवानगी कोणी दिली, आदी बाबींची तपासणी प्रशासनाने केली का? असे अनेक प्रश्न पीपल फॉर एनव्हायर्नमेंट ॲण्ड ॲनिमल वेल्फेअर संस्थेने उपस्थित केले आहेत. या सर्व प्रश्नांवर प्रकरणाची चाैकशी करावी, अशी मागणीही पीपल फॉर एनव्हायर्नमेंट ॲण्ड ॲनिमल वेल्फेअर संस्थेने केली आहे.