अतिरिक्त तेंदूपत्ता नेणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:38 AM2021-05-21T04:38:52+5:302021-05-21T04:38:52+5:30
अहेरी उपविभागातील बराचसा भाग आदिवासीबहुल आहे. या भागात तेंदूपत्ता व्यतिरिक्त दुसरा कोणताच मोठा रोजगार नसल्यामुळे याच हंगामात येथील लोक ...
अहेरी उपविभागातील बराचसा भाग आदिवासीबहुल आहे. या भागात तेंदूपत्ता व्यतिरिक्त दुसरा कोणताच मोठा रोजगार नसल्यामुळे याच हंगामात येथील लोक वर्षभराचे आर्थिक बजट बसवतात. याचाच फायदा तेंदू ठेकेदार घेतात. ग्राम समितीसोबत झालेल्या करारापेक्षा जास्त तेंदूपत्ता ते घेऊन जातात. याकामात त्यांना वनविभाग व स्थानिक लोकांची छुपी मदत असते; परंतु यात नुकसान मात्र निरपराध आदिवासी लोकांचेच हाेते. तसेच भरपूर वृक्षतोड होत असल्याने जंगलाचे नुकसान हाेते. अतिरिक्त आणि चोरीने जाणारा माल लाखोंच्या घरात आहे. त्यामुळे निरपराध आदिवासी लोकांची दिशाभूल करून अतिरिक्त तेंदूपत्ता घेऊन जाणाऱ्या ठेकेदारांवर ॲट्राॅसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संदीप काेरेत यांनी खासदार अशोक नेते व मुख्यवनसंरक्षक डाॅ. किशाेर मानकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.