डॉक्टरांवर कारवाई करा
By admin | Published: May 6, 2017 01:23 AM2017-05-06T01:23:21+5:302017-05-06T01:23:21+5:30
भामरागड येथे एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने दंत चिकित्सक डॉ. रोशन दुर्गे यांनी अधिकार नसतानाही
तालुका प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : भामरागड येथे एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने दंत चिकित्सक डॉ. रोशन दुर्गे यांनी अधिकार नसतानाही एका लहान बाळावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये २० एप्रिल रोजी बाळाचा मृत्यू झाला. यासाठी जबाबदार असलेल्या डॉ. रोशन दुर्गे व रुग्णलयातून गायब असलेले प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नटवरलाल शृंगारे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून भामरागडचे सभापती सुखराम मडावी यांनी केली आहे.
तालुक्यातील बिनागुंडा येथील धबधब्याच्या पाण्यात बुडून डॉ. आर. एल. जामी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूसाठी बिनागुंडा येथे गेलेले डॉक्टरच जबाबदार आहेत, असा आरोप होत आहे. डॉ. जामी यांच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवसापासूनच डॉ. शृंगारे फरार आहेत. बेबी पांडू तिम्मा यांच्या बाळाचा मृत्यू झाला. त्यामुळे डॉ. शृंगारे व डॉ. दुर्गे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनावर साधू पुंगाटी, सनू पल्लो, मुरा आतलामी, अनिल लेकामी, सपना रामटेके, चिन्ना मडावी, झुरू मडावी, शोभा बत्तुलवार, संजय गावडे, देवू मट्टामी, रामजी मट्टामी, डुंगा पुंगाटी, लालसू नागोटी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.