घरकूल हडपणाºयांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:21 AM2017-09-11T00:21:13+5:302017-09-11T00:21:38+5:30
तालुक्यातील कोचिनारा ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व उपसरपंच यांनी संगणमत करून घरकुलांच्या रकमेची अफरातफर केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : तालुक्यातील कोचिनारा ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व उपसरपंच यांनी संगणमत करून घरकुलांच्या रकमेची अफरातफर केली आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अन्यथा १३ सप्टेंबर रोजी कोरची-बेडगाव मार्गावर सकाळी ९ वाजेपासून बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपचांयत सदस्य रघुराम बरनू देवांगण, निर्मला परसराम कराडे यांनी कोरचीचे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
कोचिनारा ग्रामपंचायतीतून माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळविली असता, दोन लाभार्थ्यांच्या घरकुलाचे बांधकाम न करता घरकुलाच्या रकमेची अफरातफर केली आहे. गरजू लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ न देता एकाच लाभार्थ्याला दोन वेळा घरकूल मंजूर केले आहे. काही घरकुलांचे बांधकाम न करताच रक्कम उचलण्यात आली आहे. याबाबत संवर्ग विकास अधिकारी यांना १५ जून रोजी निवेदन दिले. २९ जून रोजी कोरची-बेडगाव मार्गावर चक्काजाम आंदोलन केले. पोलिसांनाही तक्रार दिली. आंदोलनस्थळी आलेल्या अधिकाºयांनी १० दिवसात या प्रकरणाचा तपास करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही कोणती कारवाई झाली नाही. २०१५ मध्ये तेंदूपत्ता बोनसची रक्कम अजूनपर्यंत उपलब्ध झाली नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे.
या प्रकरणा तपास करून दोषींवर कारवाई न केल्यास १३ सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनाच्या इशाºयानंतर प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे गावकºयांचे लक्ष लागले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असतानाही संबंधितांवर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणासंदर्भात जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासनाने गांभिर्याने पावले उचलावित जेणे करून नागरिकांना न्याय मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे.