‘त्या’ लेआऊट धारकावर कारवाई करा

By Admin | Published: November 8, 2014 10:37 PM2014-11-08T22:37:45+5:302014-11-08T22:37:45+5:30

आरमोरी येथील एका लेआऊटधारकाने सर्व्हे नं. १३२३/१ आराजी ०.३६ हेक्टर आर शेतजमिन खरेदी करून प्लॉट पाडले. नगर रचनाकाराचा मंजूर लेआऊटमध्ये ५० फुटाचा डीपी रोड असतांना सदर रोड

Take action on the 'Layout' layout | ‘त्या’ लेआऊट धारकावर कारवाई करा

‘त्या’ लेआऊट धारकावर कारवाई करा

googlenewsNext

आरमोरी : आरमोरी येथील एका लेआऊटधारकाने सर्व्हे नं. १३२३/१ आराजी ०.३६ हेक्टर आर शेतजमिन खरेदी करून प्लॉट पाडले. नगर रचनाकाराचा मंजूर लेआऊटमध्ये ५० फुटाचा डीपी रोड असतांना सदर रोड पूर्णपणे दुसऱ्याबाजुने वळविण्यात आला. त्यामुळे मूळ मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी त्रास होत आहे. त्यामुळे या प्रकारास कारणीभूत असलेल्या संबंधीत लेआऊटधारकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत सतिश गजभिये यांनी केली.
पत्रकार परिषदेत माहिती देतांना गजभिये म्हणाले, डीपी रोड सर्व्हे नं. १३१५ व सर्व्हे नं. १३१६ पर्यंत सलग काढण्यात आलेला आहे. सर्व्हे नं. १३२३/१ मध्ये सदर रस्ता दुसऱ्या बाजुने वळविण्यात आला आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असतांनाही या नकाशाला कोणत्या अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली, याची चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी सतीश गजभिये यांनी यावेळी केली. आरमोरी येथील सहकारी बँक शाखेच्या मागे एक भूखंड अकृषक करून तेथेसुद्धा ५० फुटाचा डीपी रोड नष्ट करण्यात आला, असाही आरोप गजभिये यांनी यावेळी केला. दोन्ही पेट्रोलपंपाच्या मधून जाणाऱ्या डीपी रोडवर पूर्वेकडे डीपी रोड बंद करण्यात आला आहे. आम्ही या परिसरात राहत असल्याने या परिसरातील नागरिकांचा रस्ता बंद झाला आहे. सदर बांधकाम बंद करून मार्ग मोकळा करण्यात यावा, याबाबत अनेकदा निवेदन देण्यात आले. मात्र कारवाई झाली नाही.
याशिवाय आमरण उपोषण करण्याचे नोटीस दिल्यानंतर तत्कालीन तहसीलदारांनी उपोषण मंडपाला भेट देऊन काम बंद करण्याबाबत लेखी आश्वासन दिले होते. मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, अशीही माहिती गजभिये यांनी यावेळी दिली. सदर अवैध लेआऊट प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, ये-जा करण्यासाठी असलेला ५० फुटाचा मंजूर डीपी रोड खुला करण्यात यावा, अन्यथा १० नोव्हेंबरपासून तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
आरमोरी येथील सर्व्हे नं. १३२३/१ आराजी ०.३० हेक्टर आरमध्ये माझा लेआऊट असून प्लॉट क्र. १, ३ व ४ च्या पूर्वेला १५०० मीटर रूंदीचा डीपी रोड असून सदर रोड थोड्याप्रमाणात माझ्या जागेतून गेलेला आहे. त्यामुळे सदर रस्ता आपण मोक्यावर सोडलेला आहे. सदर डीपी रोड माझ्या जागेतून जात नसल्याने त्या रोडशी आपला काहीही संबंध येत नाही, असे त्या लेआऊटधारकांनी म्हटले आहे.

Web Title: Take action on the 'Layout' layout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.