अटल विकास योजनेचा लाभ घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 12:32 AM2019-06-07T00:32:19+5:302019-06-07T00:34:30+5:30

देशाचे माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने अटल महापणन विकास अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत शेतकरी, उत्पादन संस्था व महिला स्वयंसहायता गट यांच्या बटकटीकरणासाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विकासाच्या विविध योजना असून शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन आ. कृष्णा गजबे यांनी केले.

Take advantage of the Atal Vikas Yojana | अटल विकास योजनेचा लाभ घ्या

अटल विकास योजनेचा लाभ घ्या

Next
ठळक मुद्देआमदारांचे प्रतिपादन : देलनवाडी येथे अटल महापणन बी-बियाणे केंद्राचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : देशाचे माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने अटल महापणन विकास अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत शेतकरी, उत्पादन संस्था व महिला स्वयंसहायता गट यांच्या बटकटीकरणासाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विकासाच्या विविध योजना असून शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन आ. कृष्णा गजबे यांनी केले.
आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देलनवाडीच्या वतीने अटल महापणन विकास अभियानांतर्गत बी-बियाणे विक्री शुभारंभ व कृषी मेळावा गुरूवारी घेण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन जि. प. सदस्य संपत आळे यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बारीकराव पदा, उपाध्यक्ष रत्नाकर धाईत, जिल्हा व्यवस्थापक अतुल महाजन, पं. स. सदस्य किरण मस्के, सरपंच माणिक पेंदाम, मानापूरचे सरपंच धनिराम कुमरे, चांगदेव फाये, मन्साराम मडावी, उपप्रादेशिक व्यवस्थापक आर. एम. पेंदाम, पंकज खरवडे, नंदू पेट्टेवार, कृउबासचे संचालक विनोद खुणे, ईश्वर मडावी, महादेव मेश्राम, वासुदेव घोडमारे, व्यवस्थापक हेमंत शेंद्रे, चोखाराम मोहुर्ले, पुंडलिक अंबादे व शेतकरी उपस्थित होते. या केंद्रांमधून शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात बियाणे उपलब्ध होणार आहे. प्रास्ताविक बी. पी. घोडमारे, संचालन दिलीप कुमरे यांनी केले.
मका आधारभूत किमतीत खरेदी
मागील पाच वर्षांपासून जिल्ह्यात मक्याचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आधारभूत किमतीत मक्याची खरेदी करण्याकरिता केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकºयांनी केली होती. सदर मागणीचा पाठपुरावा मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आला. त्यामुळे मकासुद्धा आधारभूत किमतीत खरेदी केला जाणार आहे. तसेच जे शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित राहिले अशा शेतकºयांचे देखील कर्ज माफ होणार आहे, अशी माहितीही आ. कृष्णा गजबे यांनी कार्यक्रमाप्रसंगी दिली. या कार्यक्रमात शेतकºयांनी परिसरातील अनेक समस्या मांडून त्या सोडविण्याची मागणी केली असता आमदारांनी शेतकºयांना समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी मानापूर व देलनवाडी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Take advantage of the Atal Vikas Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.