आधारभूत योजनेचा लाभ घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 12:54 AM2018-11-10T00:54:08+5:302018-11-10T00:54:49+5:30

आधारभूत धान खरेदी केंद्राचा अनेक ठिकाणी शुभारंभ केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या मळणी झालेले हलके व मध्यम प्रतिचे धान आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ. कृष्णा गजबे यांनी केले.

Take advantage of the basic plan | आधारभूत योजनेचा लाभ घ्या

आधारभूत योजनेचा लाभ घ्या

Next
ठळक मुद्देआमदारांचे आवाहन : कुरखेडा तालुक्यात तीन ठिकाणी धान खरेदीची सोय

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : आधारभूत धान खरेदी केंद्राचा अनेक ठिकाणी शुभारंभ केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या मळणी झालेले हलके व मध्यम प्रतिचे धान आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ. कृष्णा गजबे यांनी केले.
तालुक्यातील खरकाडा (घाटी) सोनसरी व उराडी या तीन ठिकाणी धान खरेदी केंद्राचे उद्घाटन आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि. प. सदस्य भाग्यवान टेकाम, आविका संघटनेचे जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये, नगरसेवक अ‍ॅड. उमेश वालदे, कृउबासचे सभापती खिळसागर नाकाडे, उल्हास महाजन, खरकाडाचे मुखरुजी टेकाम, उद्धवजी गहाणे, संचालक मुरारी मडावी, मारोती मडावी, सदानंद फुले, रघुनाथ बांगडकर, चैतुजी भैसारे, जि. एस. मदनकर, उराडीचे दत्तू क्षिरसागर, हरिदास गरमडे, अशोक चौधरी, रुषी डोंगरवार, टेटु नाकाडे, गोपीनाथ सुकारे, शंकर सुकारे, तुकाराम टिकले, गजानन उरकुडे, सुदाम सुकारे, सोन्सरीचे तुळशीदास शेंन्डे, राजू रामटेके, दीपक धोटे, प्रकाश डुंबरे, रामलाल प्रधान, चंदू प्रधान, व्यवस्थापक बोरकर व शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Take advantage of the basic plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.