कुत्र्यांचा बंदोबस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:26 AM2021-05-28T04:26:58+5:302021-05-28T04:26:58+5:30
एटापल्ली : दिवसेंदिवस शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नगरपंचायतीची आहे. या कुत्र्यांचा ...
एटापल्ली : दिवसेंदिवस शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नगरपंचायतीची आहे. या कुत्र्यांचा बंदोेबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.
मार्ग खड्ड्यात
गडचिरोली : तालुक्यातील उसेगाव ते भिकारमौशी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
औद्योगिक वसाहतीचे काम थंड बस्त्यात
धानोरा : छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या धानोरा तालुका मुख्यालयात औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, याबाबत शासनस्तरावरून अंमलबजावणी करण्यात आली नाही.
मध संकलनाच्या प्रशिक्षणाची मागणी
धानोरा : जिल्ह्यात मध संकलनाला चांगला वाव आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मध संकलनाचे प्रशिक्षण दिल्यास चांगल्या दर्जाचे मध संकलन होण्यास मदत होईल. त्यामुळे मध संकलनाचे प्रशिक्षण देण्याची मागणी केली जात आहे.
देलाेडा-सूर्यडाेंगरी मार्ग उखडला
वडधा : देलाेडा- सूर्यडाेंगरी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
नाल्या तुंबल्या
सिराेंचा : नगरपंचायतीच्यावतीने शहरातील नाल्यांचा नियमितपणे उपसा केला जात नाही. त्यामुळे अनेक नाल्या तुंबल्या आहेत. काही नाल्या तर वर्षातून एकदाच पावसाळ्यापूर्वी उपसल्या जातात. ही अतिशय गंभीर बाब आहे. नगरपंचायत स्वच्छतेसाठी आग्रह धरत असताना, स्वत:च स्वच्छतेकडे दुर्लक्ष करते.
९० टक्के पथदिवे बंद
गडचिराेली : आरमाेरी मार्गावर कठाणी नदीपर्यंत पथदिवे लावण्यात आले आहेत. मात्र, यातील ९० टक्के पथदिवे बंद आहेत. या मार्गावर रात्री व पहाटेला शेकडाे नागरिक फिरण्यासाठी जातात. त्यामुळे नगरपरिषदेने या मार्गावर पथदिवे लावले आहेत. मात्र, यातील ९० टक्के पथदिवे सद्यस्थितीत बंद पडून आहेत.
मिरकलात वीज नाही
अहेरी : तालुका मुख्यालयापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या मिरकल गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. प्रधानमंत्री ग्रामसडक याेजनेंतर्गतही या गावाला रस्ता बांधून देण्यात आला नाही. त्यामुळे जंगलातून जाणाऱ्या पायवाटेने हे गाव गाठावे लागते. विजेचे खांब लावले. मात्र, वीज पाेहाेचली नाही.
गतिरोधकाची गरज
गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी मार्गावर भरधाव वाहतूक होत असल्याने गोगाव येथील बसथांब्यावर गतिरोधक निर्माण करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. गतिरोधकाअभावी या ठिकाणी अनेकदा अपघात घडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी गतिराेधकाचे बांधकाम करावे, अशी मागणी आहे.
शेतीचा नमुना आठ द्या
वैरागड : वनहक्क कायद्यांतर्गत शेतकऱ्यांना अतिक्रमित जागेच्या मालकी हक्काचे पट्टे देण्याची कार्यवाही जिल्ह्यात सुरू आहे. मात्र, सदर पट्टे मिळालेले शेकडो शेतकरी सात-बाऱ्यापासून वंचित आहेत. सात-बारा मिळालेले शेतकरीसुद्धा नमुना आठपासून वंचित आहेत. पीक कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत.
सीसीटीव्ही कॅमेरे लावा
गडचिरोली : खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश शासनाने दिले होते. मात्र, यासाठी अनुदानाची तजवीज शासनाने करून दिली नसल्याने अजूनपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील एकाही शाळेने सीसीटीव्ही कॅमेरे लावले नाहीत. त्यामुळे धाेका आहे.
मातीचे बंधारे बांधा
आलापल्ली : वन विभागातर्फे दोन वर्षांपूर्वी जंगलातील सहा स्थानांवर मातीचे बांध बांधण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता; परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रस्ताव अजूनही धूळखात पडला आहे. मातीचे बंधारे निर्माण झाल्यास सिंचनाची सोय होईल.
खाऊचा दर्जा खालावला
अहेरी : अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरविला जातो. मात्र मागील काही दिवसांपासून या शालेय पोषण आहाराचा दर्जा घसरत चालला आहे. त्यामुळे विद्यार्थी सदर पोषण आहार खात नाहीत. परिणामी पोषण आहार फेकून द्यावा लागतो. आहाराच्या दर्जाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी हाेत आहे.
कचऱ्याचे व्यवस्थापन करा
आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे पसरून राहतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी होत आहे.