सण-उत्सवात काेराेनाबाबत काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:40 AM2021-09-06T04:40:59+5:302021-09-06T04:40:59+5:30
काेट ... काेराेना संसर्गाने सर्व स्तरांतील लाेकांचे जीवन प्रभावित केले. लहानांपासून तर माेठ्यांपर्यंत सर्वांनाच काेराेना संसर्गाच्या काळात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष ...
काेट ...
काेराेना संसर्गाने सर्व स्तरांतील लाेकांचे जीवन प्रभावित केले. लहानांपासून तर माेठ्यांपर्यंत सर्वांनाच काेराेना संसर्गाच्या काळात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष त्रास सहन करावा लागला. अशी पाळी पुन्हा येऊ नये, याकरिता गडचिराेली जिल्हावासीयांनी काेराेनाचे नियम पाळून विविध सण संयम ठेवून साजरे करावे. काेराेनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रत्येकांनी मास्क घालावा.
- डाॅ.सारंग काेटरंगे, वैद्यकीय अधिकारी, गडचिराेली.
काेट ......
काेराेनाचा संसर्ग प्रचंड कमी आला असला, तरी तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षकांसह सर्वांनीच काेराेनाबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे. सण-उत्सवांच्या कालावधीत संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
- प्रा.शिवदास वाढणकर, गडचिराेली
काेट .....
काेराेनाच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी सण-उत्सवाच्या काळात पूर्णता काळजी घेणे आवश्यक आहे. कार्यालयीन कामकाज करताना, तसेच सणासुदीच्या काळात नागरिकांची गर्दी हाेणार नाही, याबाबत दक्षता घेणे गरजेच आहे. गडचिराेलीवासीयांनी काेराेनाबाबत बिनधास्तपणा बाळगू नये.
- धनंजय दुम्पट्टीवार, अध्यक्ष लिपिकवर्गीय संघटना, जि.प. गडचिराेली.