‘त्या’ नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2022 05:00 AM2022-05-15T05:00:00+5:302022-05-15T05:00:47+5:30

मागील काही दिवसांपासून वरील दोन्ही तालुक्यांत वाघाची वाढती संख्या व सतत मानवी व पशू हल्ले होत आहेत. मानव-वन्यजीव संघर्षातून  वाघाच्या अस्तित्वावर दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी तातडीने येत्या दोन ते तीन दिवसांत नरभक्षी वाघाला पकडून जेरबंद करण्यात यावे किंवा वनविभागाला त्याला मारण्याची परवानगी देण्यात यावी. जंगलालगतच्या  शेताना वनविभागाकडून तातडीने जाळीचे कुंपण लावण्यात यावे.

Take care of that man-eating tiger | ‘त्या’ नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करा

‘त्या’ नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करा

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : गडचिरोली वनवृत्तातील आरमोरी व वडसा तालुक्यात होत असलेल्या वाघांच्या हल्ल्यामुळे मनुष्यहानी होत असून, वाघाचा बंदोबस्त करून तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी व मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे पत्रकाद्वारे केली आहे.
गडचिरोली वनवृत्तातील आरमोरी-वडसा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाघाचा वावर वाढलेला आहे. सद्यस्थितीत दोन्ही तालुक्यांत तेंदूपत्ता व मोहफुले संकलन करण्याचा हंगामी रोजगार सुरू असल्याने ग्रामस्थांना आपल्या उदरनिर्वाहासाठी जंगलात जाण्यावाचून पर्याय नाही. अशातच आरमोरी तालुक्यातील नलूबाई बाबूलाल जांगळे (रा. अरसोडा), नंदू  गोपाळ मेश्राम (रा. आरमोरी) या दोन व्यक्तींचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. सध्या या दोन्ही तालुक्यांत वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे वनविभागाच्या नोंदीवरून दिसून येत आहे. 
मागील काही दिवसांपासून वरील दोन्ही तालुक्यांत वाघाची वाढती संख्या व सतत मानवी व पशू हल्ले होत आहेत. मानव-वन्यजीव संघर्षातून  वाघाच्या अस्तित्वावर दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी तातडीने येत्या दोन ते तीन दिवसांत नरभक्षी वाघाला पकडून जेरबंद करण्यात यावे किंवा वनविभागाला त्याला मारण्याची परवानगी देण्यात यावी. जंगलालगतच्या  शेताना वनविभागाकडून तातडीने जाळीचे कुंपण लावण्यात यावे. तेंदुपत्ता, मोहफुले संकलन करणारे व शेतातील धान पिकाची कापणी करणाऱ्यांना मजुरांना वनविभागाकडून सुरक्षा देण्यात यावी. शेतकऱ्यांना कापणीअभावी व वन्य प्राण्यांमुळे नुकसान झालेल्या धान, भाजीपाला व अन्य पिकांची तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. आमदार गजबे यांनी आरमोरीत  उपवनसंरक्षक शर्मा यांची भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले. यावेळी पंकज खरवडे, नंदू नाकतोडे, माणिक भोयर यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.
वाघाच्या हैदाेसामुळे नागरिक भयभीत झाले असून शेतकरी ताणतणावात आहेत. वाघाचा बंदाेबस्त झाल्याशिवाय चैन पडणार नाही.

 

Web Title: Take care of that man-eating tiger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.