आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 01:05 AM2018-01-31T01:05:22+5:302018-01-31T01:05:34+5:30

स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी जिद्द, चिकाटी, परीश्रम यांच्याबरोबरच आत्मविश्वास अतिशय महत्त्वाचा आहे. सुरूवातीच्या कालावधीत अपयश येतात. मात्र अपयशांमुळे खचून न जाता आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षेची तयारी करावी, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाणे यांनी केले.

Take competitive exam confidently | आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षा द्या

आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षा द्या

Next
ठळक मुद्देदुर्वेश सोनवाणे यांचे प्रतिपादन : अल्पसंख्याक युवकांची पोलीस भरतीपूर्व परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी जिद्द, चिकाटी, परीश्रम यांच्याबरोबरच आत्मविश्वास अतिशय महत्त्वाचा आहे. सुरूवातीच्या कालावधीत अपयश येतात. मात्र अपयशांमुळे खचून न जाता आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षेची तयारी करावी, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाणे यांनी केले.
गडचिरोली येथील कल्पतरू अ‍ॅकॅडमी येथे अल्पसंख्याक समाजातील युवक, युवतीकरिता पोलीस भरतीपूर्व परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश गेडाम, ज्ञानेश्वर ठाकरे, एस. राऊत, एच. एम. लांजेवार, आशिष बारसागडे, संस्थाध्यक्ष कुणाल पडालवार आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना दुर्वेश सोनवाणे म्हणाले, बरेच विद्यार्थी काही दिवस स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. मात्र यश आले नाही तर मध्येच अभ्यास सोडून देतात. हे चुकीचे असून आपण ठरविलेले उद्दिष्ठ गाठेपर्यंत प्रत्येकाने स्वत:चे प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना नकारात्मक विचार पसरविणाºया विद्यार्थी व युवकांपासून दूर राहून सकारात्मक विचार करणाऱ्यांकडून योग्य मार्गदर्शन घ्यावे, असे मार्गदर्शन केले.
भाषणादरम्यान सोनवाणे हे अधूनमधून शायरी सांगत असल्याने विद्यार्थ्यांना सल्ला मिळण्याबरोबरच त्यांचे मनोरंजनही झाले. प्रास्ताविक कुणाल पडालवार, संचालन प्राजक्ता गुरनुले यांनी केले. यशस्वीतेसाठी चंद्रशेखर चलाख, पंकज वाटगुरे, अविनाश धोडरे यांच्यासह कल्पतरू अ‍ॅकॅडमीच्या पदाधिकारी व कर्मचाºयांनी सहकार्य केले.

Web Title: Take competitive exam confidently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.