स्वत:च्या संशोधनावर पेटंट घ्या
By admin | Published: October 19, 2015 01:56 AM2015-10-19T01:56:10+5:302015-10-19T01:56:10+5:30
२१ व्या शतकात देशाच्या संपत्तीत भर पडत असून नवनवीन स्त्रोत समोर येत आहेत.
कुरखेडा येथे कार्यशाळा : मुनघाटे महाविद्यालयात कुलगुरूंचे संशोधकांना आवाहन
कुरखेडा : २१ व्या शतकात देशाच्या संपत्तीत भर पडत असून नवनवीन स्त्रोत समोर येत आहेत. संशोधक विद्यार्थ्यांनी समाज व देशाच्या विकासाची स्वत:च्या संशोधनाचे पेटंट घेऊन त्यांचा उपयोग करावा, प्रत्येक महाविद्यालयानेही पेटंटवर भर देऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे, असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांनी केले.
कुरखेडा येथील श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयात आयोजित ‘इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट’ या एक दिवसीय राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचे संचालक डॉ. सतीश गोगुलवार होते. यावेळी प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, डॉ. पंकज बोरकर, छाया सातपुते उपस्थित होत्या.
आपल्या परिसरात वनोपजावर आधारित सुरू असलेल्या उत्पादनांचे मालकी हक्क प्राप्त होण्यासाठी पेटंट घेणे गरजेचे असून आजच्या व्यावहारीक युगात तसे केले नाही तर बासमती किंवा हळदीच्या पेटंटसाठी करावा लागलेला संघर्ष अनुभवास मिळेल, असे प्रतिपादन डॉ. गोगुलवार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजाभाऊ मुनघाटे, संचालन नरेंद्र आरेकर तर आभार डॉ. अभय सोळुंखे यांनी मानले. बौद्धिक सत्राचे संचालन डॉ. जोसेफ टी. सी. यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)