हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 11:56 PM2017-08-06T23:56:56+5:302017-08-06T23:58:59+5:30
काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहूल गांधी हे गुजरात राज्यातील बनासकांठा येथील पूरग्रस्तांची भेट घेण्यासाठी गेले असता, त्यांच्यावर जीवघेणा हमला करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहूल गांधी हे गुजरात राज्यातील बनासकांठा येथील पूरग्रस्तांची भेट घेण्यासाठी गेले असता, त्यांच्यावर जीवघेणा हमला करण्यात आला. यासाठी जबाबदार असलेल्या सर्व दोषींना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा महिला काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी केली आहे. सरकारच्या विरोधात या पदाधिकाºयांनी घोषणाबाजी करून हल्ल्याचा निषेध केला.
यावेळी जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष भावना वानखेडे, उपाध्यक्ष कल्पना नंदेश्वर, सपना गलगट, पुष्पा चुधरी, सुमन उंदीरवाडे, आशा म्हशाखेत्री, दर्शना सोरते, सुरेखा जांभुळकर, शशिकला सहारे, संघमित्रा राजवाडे, सोनू बुरांडे, पुष्पा भैसारे, कुंदा सोनटक्के, ललिता लाडे, ललिता वानखेडे, पुष्पा बातमवार, निर्मला गुरनुले, चुडादेवी बारसागडे, यमुना जुमनाके, अर्चना नागापुरे, गीता बोरकर, बबीता ढोक, अनुराधा वनकर, मंदा नंदनवार, अहिल्याबाई सहारे यांच्यासह जिल्हा महिला काँग्रेसच्या इतर पदाधिकारी उपस्थित होत्या.
केंद्र शासनाने सद्य:स्थितीत दडपशाहीचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. भाजपची सत्ता आणण्यासाठी केंद्र शासन अनेक वाममार्गांचा वापर करीत आहे. सरकारच्या या चुकीच्या धोरणाविरोधात काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वानखेडे यांनी दिला आहे.