धानाच्या नुकसानीचे सर्वेक्षण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 10:15 PM2017-11-03T22:15:06+5:302017-11-03T22:15:21+5:30
येरकड व झुपटोला परिसरातील धान मावा व तुडतुडा रोगाने करपून उद्ध्वस्त झाले. शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले असून या नुकसानीचा पंचनामा करण्यात यावा, ......
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : येरकड व झुपटोला परिसरातील धान मावा व तुडतुडा रोगाने करपून उद्ध्वस्त झाले. शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले असून या नुकसानीचा पंचनामा करण्यात यावा, अशी मागणी येरकड येथील नागरिकांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
१५ दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे दमट वातावरण निर्माण होऊन मावा व तुडतुडा रोगाने थैमान घातले होते. अनेक शेतकºयांच्या शेतातील धान करपले आहे. धान पीक ऐन निसवत असताना तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे उत्पादनात कमालीची घट होणार आहे. धानाबाई साधू भैसारे यांच्या सहा एकर शेतातील धान पीक नष्ट झाले. नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत मिळावी, यासाठी नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही महसूल, कृषी विभागाच्या कर्मचाºयांनी पंचनाम्यांना सुरुवात केली नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत मिळणार की नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे. तहसीलदारांनी या गंभीर बाबीकडे स्वत: लक्ष घालून पंचनामे करण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी केली आहे.
निवेदन देतेवेळी भोजराज कस्तुरे, नक्टू जेंगठे, गजानन गुरनुले, जयेश अंबादे, शिवदास रस्से, रेवाजी साळवे, धानाबाई भैसारे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.