गुंडापल्लीला मिळाला तलाठी
By admin | Published: November 22, 2014 01:22 AM2014-11-22T01:22:00+5:302014-11-22T01:22:00+5:30
परिसरातील गुंडापल्ली तलाठी कार्यालयातील तलाठ्याचे पद मागील पाच महिन्यांपासून रिक्त असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना...
सुभाषग्राम : परिसरातील गुंडापल्ली तलाठी कार्यालयातील तलाठ्याचे पद मागील पाच महिन्यांपासून रिक्त असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे वृत्त १५ नोव्हेंबर रोजी ‘लोकमत’ने प्रकाशित केले. यामुळे प्रशासकीय यंत्रणा खळबळून जागी झाली व वरिष्ठ अधिकारी कामाला लागले व या कार्यालयात एस. बी. झुलकंटीवार या तलाठ्याची नेमणूक केली.
गुंडापल्ली परिसरातील बहुतांश नागरिकांचा व्यवसाय शेती आहे. पीककर्ज घेण्याबरोबरच अनुदानावरील बी-बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी करण्यासाठी तलाठ्याच्या दाखल्याची गरज भासत होती. मात्र या ठिकाणी तलाठीच नसल्याने दाखला देणार कोण, असा प्रश्न उपस्थित होत होता. परिणामी शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. याबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर तलाठ्याची नेमणूक करण्यात आली. जे काम पाच महिन्यांपासून रखडले होते, ते काम ‘लोकमत’च्या एका वृत्ताने आठ दिवसात मार्गी लागले.
परिसरातील शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना आता दाखले मिळू लागल्याने त्यांच्यासाठी सोयीचे झाले आहे. परिसरातील नागरिकांनी ‘लोकमत’च्या या वृत्ताचे तोंडभरून कौतुक करीत आहेत. झुलकंटीवार हे मार्र्कं डा (कं.) येथे कार्यरत असून त्यांच्याकडे गुंडापल्ली तलाठी कार्यालयाचा प्रभार सोपविण्यात आला आहे. झुलकंठीवार यांना आदेश प्राप्त होताच त्यांनीही विलंब न करता गुंडापल्ली तलाठी कार्यालयाचा प्रभार स्वीकारून नागरिकांची कामे करण्याला सुरूवात केली आहे. (वार्ताहर)