तळेगाव जि. प. शाळा समस्यांच्या विळख्यात

By admin | Published: September 21, 2016 02:38 AM2016-09-21T02:38:53+5:302016-09-21T02:38:53+5:30

नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन कुरखेडाचे पं. स. सदस्य चांगदेव फाये व नगरसेवक अ‍ॅड. उमेश वालदे

Talegaon district Par. Recognition of School Problems | तळेगाव जि. प. शाळा समस्यांच्या विळख्यात

तळेगाव जि. प. शाळा समस्यांच्या विळख्यात

Next

छताला गळती : पदाधिकाऱ्यांच्या पाहणीत उघड
कुरखेडा : नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन कुरखेडाचे पं. स. सदस्य चांगदेव फाये व नगरसेवक अ‍ॅड. उमेश वालदे यांनी स्थानिक पंचायत समिती अंतर्गत तळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली. सदर शाळेची इमारत पावसात गळत असून प्रांगणात सर्वत्र कचरा उगवला आहे. तसेच इतर समस्यांही दिसून आल्या आहेत.
सदर शाळेतील असुविधांबाबत फाये व वालदे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करून शाळेच्या सुविधेत सुधारणा करण्यात यावी, अशी सूचना संबंधितांना केली.
तळेगाव जि. प. शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शिक्षणाची सोय असून येथे एकूण ११६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र येथील शाळा, इमारत पडक्या स्वरूपात असल्याने पावसाळ्यात पाण्याची गळती सुरू होते. सदर इमारतीमुळे विद्यार्थ्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाळेसमोर मोठे पटांगण आहे. मात्र दुर्लक्षितपणामुळे या प्रांगणात अस्वच्छता पसरली आहे. परिणामी विद्यार्थ्यांना खेळासाठी जागा शिल्लक उरली नसल्याचे भेटीदरम्यान फाये व वालदे यांना दिसून आले.
तळेगाव शाळा इमारतीच्या मोठ्या स्वरूपाच्या दुरूस्तीचा प्रस्ताव पंचायत समितीच्या मासिक सभेत मंजूर करून घेण्यात येईल, यापुढील कार्यवाहीसाठी सदर प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती फाये यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Talegaon district Par. Recognition of School Problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.