शिक्षकांच्या समस्यांबाबत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 10:31 PM2017-12-21T22:31:20+5:302017-12-21T22:31:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नव्याने रूजू झालेले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश भांड यांच्यासोबत तालुक्यातील शिक्षकांच्या समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी भांड यांचा सत्कारही करण्यात आला.
यावेळी धानोरा पंचायत समितीचे सभापती अजमन राऊत, गटशिक्षणाधिकारी रमेश उचे, शिक्षण विस्तार अधिकारी सदानंद सलाम, लेखाधिकारी शंकर कोरंटलावार, तालुकाध्यक्ष डंगाजी पेंदाम, जिल्हा सरचिटणीस रमेश रामटेके, तालुका सरचिटणीस प्रशांत काळे, गणेश काटेंगे, ओमप्रकाश सिडाम, रवींद्र घोंगडे सोमेश्वर दुर्गे, प्रकाश नागापुरे, सुभाष जांगी, नरेश गेडाम, भावेश उईके, वामन पोरेटी, मोरेश्वर अंबादे, हेमंत घोरापटीया, राजेश्वर पदा, गणेश मडावी उपस्थित होते. वरिष्ठ सहायक लिपीक मेश्राम यांना धानोरा शिक्षण विभागात कायम स्वरूपी पदस्थापना द्यावी, चटोपाध्याय, निवड वेतनश्रेणी, नियमित सेवा, स्थायी सेवा व शिक्षकांच्या अन्य प्रलंबित प्रश्नांसाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन करणे, केंद्रस्तरीय शालेय बाल कला व क्रीडा संमेलनाची निधी त्वरित आयोजकांच्या खात्यात जमा करणे, जिल्हा परिषद शाळा पेंढरी, कटेझरी नं. २ येथील शिक्षक ज्ञानेश्वर खेवले यांचे थकलेले वेतन द्यावे, रेगादंडी येथील प्राथमिक शिक्षिका एम.जे. धाईत यांचे तात्पुरते समायोजन रद्द करून त्यांना मूळ आस्थापनेवर पाठवावे, महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या राज्य अधिवेशन काळात कोणतेही प्रशिक्षण आयोजित करू नये, परीक्षांची परवानगी मिळालेल्या शिक्षकांच्या अभ्यासक्रमाची नोंद सेवापुस्तकात करावी आदी मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी यांना सादर केले. या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांना दिले.