ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:49 AM2018-09-23T00:49:01+5:302018-09-23T00:50:01+5:30

गेल्या १० दिवसांपासून जिल्हाभरात मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जात असलेल्या गणेशोत्सवाची रविवारी अनंत चतुर्दशीला सांगता होत आहे. मात्र अनेक ठिकाणी सातव्या दिवसापासूनच विसर्जनाला सुरूवात झाली.

Talk to Bappa in the dhol-tahas gazar | ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप

ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप

Next
ठळक मुद्देकर्णकर्कश डीजेला फाटा : आज अनेक ठिकाणी विसर्जन मिरवणुका; पोलिसांचा चोख बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या १० दिवसांपासून जिल्हाभरात मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जात असलेल्या गणेशोत्सवाची रविवारी अनंत चतुर्दशीला सांगता होत आहे. मात्र अनेक ठिकाणी सातव्या दिवसापासूनच विसर्जनाला सुरूवात झाली. जिल्ह्यातील ४६५ सार्वजनिक गणेश मंडळांपैकी रविवारी सर्वाधिक २६८ मंडळांच्या गणेशमूर्तींची विसर्जन मिरवणूक निघणार आहे.
उच्च न्यायालयाने कर्णकर्कश डीजेंच्या वापरावर बंदी घातल्यानंतरही काही मंडळांनी विनापरवाना डीजे लावून मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी समज दिली. त्यानंतर ऐकत नसलेल्यांवर कारवाई करण्यात आली. डीजे चालत नसल्याचे समजल्यानंतर अनेक मंडळांनी समजुतदारपणा दाखवत ढोलताशांना प्राधान्य दिले. याशिवाय झांजच्या गजरात भजन म्हणणाऱ्या पथकांना तसेच पारंपरिक आदिवासी नृत्य करणाºया पथकांनाही गणेश मंडळांकडून प्राधान्य दिले जात आहे.
यावर्षी जिल्हाभरातील ४६५ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी गणेशोत्सवासाठी नोंदणी केली होती. याशिवाय २६९१ ठिकाणी खासगी गणपतींची स्थापना झाली होती. पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत २१९ गावांमध्ये ‘एक गाव - एक गणपती’ची स्थापना करून एकात्मतेचे दर्शन घडविण्यात आले. काही मंडळांनी रक्तदान शिबिर, कबड्डी स्पर्धासारखे सामाजिक उपक्रमही राबविले. विशेष म्हणजे या उत्सवादरम्यान जिल्ह्यात कुठेही सामाजिक तेढ किंवा सार्वजनिक शांतता भंग होण्याचे प्रकार घडले नाही.
गेल्या दोन दिवसांपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुका सुरू आहेत. रविवारी गडचिरोली शहरातील १५ तर लगतच्या ग्रामीण भागातील ७ मंडळांच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. त्यासाठी ४ पोलीस उपनिरीक्षक, ३० पोलीस कर्मचारी तर ३५ होमगार्ड सुरक्षा बंदोबस्तासाठी लावण्यात आले आहेत.
संपूर्ण जिल्हाभरात रविवारी शहरी भागात ९१ तर ग्रामीण भागात १७७ मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे.
तीन मंडळांचे डीजे जप्त
गडचिरोली शहरात शुक्रवारी रात्री विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे वाजविणाºया तीन मंडळांचे डीजे जप्त करण्यात आले. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, युवा गणेश मंडळ, फुटका मंदिर, अनादी शशिकांत मंडळ रामनगर आणि बाल गणेश मंडळ, त्रिमुर्ती चौक यांच्या विसर्जन मिरवणुकीत विनापरवाना डीजेवर गाणी वाजविली जात होती. क्षमतेपेक्षा जास्त आवाजात वाजविल्या जात असलेल्या या डीजेमुळे होणारे ध्वनीप्रदुषण टाळण्यासाठी एसडीपीओ विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक उदार, उपनिरीक्षक पाटील आदींनी ते डीजे जप्त करण्याची कारवाई केली. यात डीजेसह ६ मोठी वाहने, ३ जनरेटरही जप्त करण्यात आले.
वीज पुरवठ्यासाठी कारवाई नाहीच
जिल्ह्यातील ४०० पेक्षा जास्त सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीज पुरवठा घेतला नसल्याची बाब निदर्शनास आल्यानंतरही महावितरण कंपनीने कोणत्याही गणेश मंडळावर दंडात्मक कारवाई केली नाही. अशा मंडळांचे सर्व्हेक्षण करून त्यांना अधिकृत कनेक्शन घेण्यास सांगितले जाईल आणि न घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात कोणावरही कारवाई झाली नाही.

Web Title: Talk to Bappa in the dhol-tahas gazar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.