शिवार सभेत शेतकऱ्यांशी संवाद

By Admin | Published: June 1, 2017 01:49 AM2017-06-01T01:49:55+5:302017-06-01T01:49:55+5:30

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चामोर्शी, गडचिरोली, धानोरा या तीन तालुक्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने

Talk to farmers in Shivar Sabha | शिवार सभेत शेतकऱ्यांशी संवाद

शिवार सभेत शेतकऱ्यांशी संवाद

googlenewsNext

योजनांची दिली माहिती : गडचिरोली, चामोर्शी, धानोरा तालुक्यात आमदारांची सभा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चामोर्शी, गडचिरोली, धानोरा या तीन तालुक्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने आ. डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्त्वात ४० गावांत शिवार संवाद सभा यात्रा काढण्यात आली. या सभांमध्ये शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांची माहिती देण्यात आली व शेतकऱ्यांच्या अनेक समस्याही जाणून घेतल्या.
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना सुरू करण्यात आल्या आहेत. ४० हजार कोटीहून अधिक रूपयांची गुंतवणूक शेतीसाठी करण्यात आली आहे. आघाडी शासनाच्या काळापासून प्रलंबित असलेली कृषी पंप जोडणी विद्यमान सरकारने पूर्ण केली आहे. आघाडी शासनाच्या १५ वर्षाच्या काळात केवळ २३ हजार कृषी पंपांना वीज जोडणी देण्यात आली तर विद्यमान सरकारच्या काळात अडीच वर्षात अडीच लाखाहून अधिक वीज जोडणी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा विमा व विविध योजना राबविल्या जात आहेत, अशी माहिती आ. डॉ. देवराव होळी यांनी शिवार सभेत मार्गदर्शन करताना दिली.
शिवार संवाद यात्रेत जि. प. अध्यक्ष योगिता भांडेकर, प्रभारी रमेश भुरसे, भाजपचे गडचिरोली तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, चामोर्शीचे दिलीप चलाख, धानोराचे शशिकांत साळवे तसेच संबंधित क्षेत्रातील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, स्थानिक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यात्रेदरम्यान शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेतली. व आपल्या समस्यांही मांडल्या. आ. डॉ. देवराव होळी यांनी हजारो शेतकऱ्यांशी यावेळी संवाद साधला.

गडचिरोली तालुक्यातील मारोडा, सावेला, पोटेगाव, देवापूर, राजोली, गव्हाळहेटी, कोसमघाट, खरपुंडी, आंबेटोला, वाकडी, राखी, गुरवळा, गोविंदपूर, चामोर्शी तालुक्यातील गिलगाव, नवरगाव, कुथेगाव, वायगाव, थाटरी, येनापूर, मुधोली चक, जैैरामपूर, गणपूर, धर्मपूर, हळदीचक, धानोरा तालुक्यातील जांभळी, साखेरा, खुटगाव, कटेझरी, मेंढाटोला, चातगाव, निमनवाडा, रांगी आदी गावांमध्ये शिवार सभा आयोजित करण्यात आल्या. या सभांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. तसेच शेतकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.

Web Title: Talk to farmers in Shivar Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.