आरटीओ आॅफिसच्या इमारतीसाठी अर्थमंत्र्यांना बोलून निधी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 01:26 AM2017-10-08T01:26:39+5:302017-10-08T01:26:48+5:30
गडचिरोली येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांच्या कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम अनेक दिवसांपासून अर्धवट आहे. ८० टक्के काम झाले असले तरी २० टक्के काम निधीअभावी राहिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांच्या कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम अनेक दिवसांपासून अर्धवट आहे. ८० टक्के काम झाले असले तरी २० टक्के काम निधीअभावी राहिले आहे. ही बाब लोकमतने निदर्शनास आणून देताच परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी यासंदर्भात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करून उर्वरित कामासाठी तत्काळ निधीची व्यवस्था करणार, अशी ग्वाही दिली.
गडचिरोली दौºयावर आले असताना विश्राम भवनावर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आरटीओ कार्यालयाच्या अर्धवट बांधकामाबद्दलचे वृत्त शनिवारच्या अंकात लोकमतने प्रकाशित केले होते. ना.रावते यांनी ही बातमी वाचून हे इमारत बांधकाम पूर्ण करण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा निधी मिळवून देण्याची ग्वाही दिली.
रावते यांनी कर्जमाफीसंदर्भात गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या गतीमान कामावर समाधान व्यक्त केले. फक्त कर्जमाफीचा शक्य तितक्या लवकर लाभ देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले. आदिवासी समाजातील उमेदवारांना एसटी महामंडळात चालक म्हणून नोकरी देण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार, शहर अध्यक्ष रामकिरीत यादव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.