ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तालुका प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:34 AM2020-12-29T04:34:34+5:302020-12-29T04:34:34+5:30

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २८ डिसेंबर २०२० ते १ जानेवारी २०२१ या कालावधीत नामांकन सादर करता येणार आहे. ४ एप्रिलला नामनिर्देशनं ...

Taluka administration ready for Gram Panchayat elections | ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तालुका प्रशासन सज्ज

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तालुका प्रशासन सज्ज

googlenewsNext

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २८ डिसेंबर २०२० ते १ जानेवारी २०२१ या कालावधीत नामांकन सादर करता येणार आहे. ४ एप्रिलला नामनिर्देशनं पत्रांची छाननी हाेईल. ६ जानेवारीपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत असून त्यानंतर चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. २० जानेवारीला मतदान प्रक्रिया तर २२ जानेवारीला मतमाेजणी होणार आहे.

चामाेर्शी तालुक्याच्या ६९ ग्रामपंचायतीमध्ये एकूण ६०३ सदस्यांची निवड करायची आहे. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील ४७ सदस्य राहणार आहेत. त्यातील २० जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गातील १६० सदस्यांची निवड करावयाची असून यामध्ये ९१ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नामाप्र मधून १३१ सदस्यांची निवड करायची आहे. यापैकी ७१ जागा महिलांसाठी राखीव आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी २६५ सदस्यांची निवड करावयाची असून त्यापैकी १५४ जागा महिलांसाठी राखीव आहेत.

तालुक्यात ग्रा.पं.निवडणुकीमध्ये एकूण १ लाख १० हजार ३८३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये ५७ हजार १३० पुरूष व ५३ हजार २५३ महिला मतदारांचा समावेश आहे. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर नामांकन अर्ज सादर करताना काेविडच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नामांकन सादर करताना एकावेळी एकाच उमेदवाराने मास्क लावून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षामध्ये प्रवेश करावयाचा आहे. ग्रामपंचायत निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार आकाश अवतारे यांनी केले आहे.

बाॅक्स....

असे आहे मनुष्यबळ

नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यासाठी ग्रामपंचायतनिहाय एकूण १८ निवडणूक निर्णय अधिकारी व १८ सहायकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची व्यवस्था चामाेर्शीच्या तहसील कार्यालयात करण्यात आली आहे. तालुक्यामध्ये एकूण २६० मतदान केंद्राध्यक्ष असून ७८० मतदान अधिकारी आहेत. याशिवाय निवडणूक पार पाडण्यासाठी २६० मतदान पथक तयार करण्यात आले आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.

फाेटाे....

चामाेर्शीच्या तहसील कार्यालयात निवडणुकीच्या नामांकन प्रक्रियेसाठी तयार करण्यात आलेले मंडप व उपस्थित कर्मचारी.

Web Title: Taluka administration ready for Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.