नळ पाणीपुरवठा प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:51 AM2018-10-29T00:51:58+5:302018-10-29T00:52:27+5:30

स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने शहराच्या सर्व वॉर्डात नळ पाणीपुरवठा केला जातो. मात्र वैनगंगा नदीपात्रातील पाणी इंटेकवेलमध्ये खेचण्यासाठीच्या मोटारमध्ये बिघाड निर्माण झाल्याने शनिवारी व रविवारी असे दोन दिवस शहरातील पाणीपुरवठा ठप्प झाला.

Tap water affected | नळ पाणीपुरवठा प्रभावित

नळ पाणीपुरवठा प्रभावित

googlenewsNext
ठळक मुद्देमोटार बिघडल्याने समस्या : महिलांची विहीर व हातपंपावर गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने शहराच्या सर्व वॉर्डात नळ पाणीपुरवठा केला जातो. मात्र वैनगंगा नदीपात्रातील पाणी इंटेकवेलमध्ये खेचण्यासाठीच्या मोटारमध्ये बिघाड निर्माण झाल्याने शनिवारी व रविवारी असे दोन दिवस शहरातील पाणीपुरवठा ठप्प झाला. रविवारी नळपाणीपुरवठा काही वॉर्डात पूर्ववत सुरू झाला.
स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने नळ पाणीपुरवठा करण्यासाठी शहराच्या विविध ठिकाणी सात जलकुंभ निर्माण करण्यात आले. वैनगंगा नदी परिसरातील बोरमाळा घाटावर पालिकेच्या वतीने नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली आहे. नदीपात्रात इंटेकवेल व वरच्या भागात मोठी पाणीटाकी निर्माण करण्यात आली आहे. नदीपात्रातील पाणी इंटेकवेलमधून मोटारच्या सहाय्याने वरच्या टाकीत टाकले जाते. वरच्या टाकीतून हे पाणी जलशुद्धी केंद्राच्या ढोल्यात आणले जाते. या जलशुद्धी केंद्रातून इंदिरा गांधी चौक, गोकूलनगर व इतर भागातील टाकींमध्ये पाणी सोडले जाते. त्यानंतर या टाकींमधून पाईपलाईनद्वारे नागरिकांना नळाचे पाणी पुरविले जाते.
दरम्यान इंटेकवेलमध्ये पाणी खेचणाऱ्या मोटारमध्ये बिघाड निर्माण झाल्याने शहरातील पाणीपुरवठा ठप्प झाला. पालिकेच्या वतीने दररोज सकाळी व सायंकाळी अशा दोन वेळेत नळ पाणी पुरवठा केला जातो. शनिवारी मोटारची दुरूस्ती न झाल्याने सायंकाळी शहरात नळ पाणीपुरवठा झाला नाही. तसेच रात्री टाकीमध्ये पाणी सोडता न आल्याने नळ पाणीपुरवठा रविवारी सकाळच्या सुमारास बंद होता. रविवारी दुपारी १२ पर्यंत मोटारची दुरूस्ती करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. रविवारी सायंकाळी शहराच्या काही भागात नळ पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाल्याची माहीती आहे.

नगर पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतील मोटारमध्ये बिघाड निर्माण झाल्याने दोन दिवस शहरातील पाणीपुरवठा बंद होता. आता या मोटारची दुरूस्ती झाली असून रविवारी सायंकाळपासून शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होईल.
- प्रवीण वाघरे, पाणीपुरवठा सभापती, नगर परिषद, गडचिरोली

नळ पाणीपुरवठयाच्या कामात हयगय केली जात असल्याने आपण काही दिवसांपुर्वीच पाणीपुरवठा विभागाचे अभियंता चौधरी यांना नोटिस बजावली आहे. आता मुख्य पंपाच्या मोटारची दुरूस्ती करण्यात आली ेअसून रविवारी सायंकाळी पाणी पुरवठा सुरू झाला.
- संजीव ओहोड, मुख्याधिकारी नगर परिषद, गडचिरोली

Web Title: Tap water affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी