दररोज 2 हजार 160 काेराेना चाचण्यांचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 05:00 AM2020-12-06T05:00:00+5:302020-12-06T05:00:32+5:30
जिल्ह्याची लाेकसंख्या, पाॅझिटिव्हीटीचा दर यावरून दरदिवशी करावयाच्या टेस्टचा आकडा ठरविण्यात आला आहे. आराेग्य विभागाकडे उपलब्ध माहितीनुसार गडचिराेली जिल्ह्याची लाेकसंख्या ११ लाख ४६ हजार १९४ एवढी आहे. पाॅझिटिव्हीटीचा सध्याचा दर लक्षात घेता दरदिवशी २ हजार १६० चाचण्या करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. दरदिवशी करण्यात येणाऱ्या एकूण चाचण्यांमध्ये डिसेंबर महिन्यात किमान ६५ टक्के आरटीपीसीआर व ३५ टक्के रॅपिडॲन्टीजन टेस्ट करण्याचे निर्देश आहेत.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेना साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जास्तीत जास्त व वेळेवर चाचण्या हाेणे आवश्यक असल्याने राज्याच्या आराेग्य विभागाने गडचिराेली जिल्ह्याला दरदिवशी २ हजार १६० काेराेना टेस्टचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. टेस्टमध्ये आरटीपीसीआर व रॅपीडॲन्टीजन टेस्ट किती कराव्या, याचेही प्रमाण ठरवून दिले आहे.
जिल्ह्याची लाेकसंख्या, पाॅझिटिव्हीटीचा दर यावरून दरदिवशी करावयाच्या टेस्टचा आकडा ठरविण्यात आला आहे. आराेग्य विभागाकडे उपलब्ध माहितीनुसार गडचिराेली जिल्ह्याची लाेकसंख्या ११ लाख ४६ हजार १९४ एवढी आहे. पाॅझिटिव्हीटीचा सध्याचा दर लक्षात घेता दरदिवशी २ हजार १६० चाचण्या करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. दरदिवशी करण्यात येणाऱ्या एकूण चाचण्यांमध्ये डिसेंबर महिन्यात किमान ६५ टक्के आरटीपीसीआर व ३५ टक्के रॅपिडॲन्टीजन टेस्ट करण्याचे निर्देश आहेत. पुढील महिन्यात आरटीपीसीआरचे प्रमाणे ५ टक्क्याने वाढवावे लागणार आहे. सर्व रूग्णांचे नियमित सर्वेक्षण करून त्यांची चाचणी केली जाणार आहे. जनतेशी माेठ्या प्रमाणात संपर्क येणाऱ्या भाजीविक्रेते, किराणा दुकानदार, फळ विक्रेते आदींची चाचणी करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. काेराेना पाॅझिटीव्ह व्यक्तींचे काॅन्टॅक्ट ट्रेसींग करून हाय रिस्क काॅन्टॅक्ट असलेल्या व्यक्तीची चाचणी आवश्यक करण्यात आली आहे. आरटीपीसीआर टेस्टचा रिपाेर्ट वेळेत उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्हाभरातील नमुने आरटीपीसीआर प्रयाेगशाळेत वेळेवर पाेहाेचतील. याची सुध्दा खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
आरटीपीसीआर चाचण्यांसाठी अडचण
गडचिराेली जिल्ह्याला दरदिवशी २ हजार १६० काेराेना टेस्ट करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. यापूर्वीही दरदिवशी जवळपास १ हजार ५०० टेस्ट केल्या जात हाेत्या. त्यामुळे आराेग्य विभागाने दिलेल्या उद्दिष्टाएवढ्या चाचण्या करणे शक्य आहे. मात्र एकूण चाचण्यांमध्ये आरटीपीसीआरचे प्रमाण ६५ टक्के तर रॅपिड ॲन्टीजन टेस्टचे प्रमाण ३५ टक्के ठरवून दिले आहे. याचा अर्थ जवळपास दरदिवशी जवळपास १ हजार ४०० आरटीपीसीआर टेस्ट कराव्या लागतील. आरटीपीसीआर टेस्टची जिल्हाभरात एकच प्रयाेगशाळा आहे. त्यामुळे दरदिवशी एवढ्या माेठ्या प्रमाणात टेस्ट करणे कठीण हाेणार आहे. मात्र रॅपिड ॲन्टीजन टेस्टच्या कीट पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच रॅपिडॲन्टीजनचा रिपाेर्ट तत्काळ येत असल्याने या चाचण्यांचे प्रमाण वाढविणे शक्य आहे.
गडचिराेली जिल्ह्याला दरदिवशी २ हजार १६० चाचण्या करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. यापूर्वीही दरदिवशी सरासरी १ हजार ५०० चाचण्या हाेतात. त्यामुळे आराेग्य विभागाने दिलेले उद्दिष्ट गाठणे फारसे कठीण नाही. प्राथमिक आराेग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, काेविड केअर सेंटर, जिल्हा रूग्णालय या ठिकाणी टेस्टची सुविधा उपलबध आहे.
- डाॅ. शशिकांत शंभरकर, जिल्हा आराेग्य अधिकारी, गडचिराेली