एकाच दिवशी २९ लाख ५१ हजारांचा कर वसूल

By admin | Published: November 12, 2016 02:03 AM2016-11-12T02:03:59+5:302016-11-12T02:03:59+5:30

राज्य सरकारने ११ नोव्हेंबर रोजी राज्यातील नगर पंचायती व नगर पालिकांमध्ये जुन्या रद्द झालेल्या ५०० व १००० च्या

Tax collection of 29 lakh 51 thousand on one day | एकाच दिवशी २९ लाख ५१ हजारांचा कर वसूल

एकाच दिवशी २९ लाख ५१ हजारांचा कर वसूल

Next

रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया सुरूच : दोन नगरपालिकांसह १० नगर पंचायतीत थकबाकी वसुलीचे काम
गडचिरोली : राज्य सरकारने ११ नोव्हेंबर रोजी राज्यातील नगर पंचायती व नगर पालिकांमध्ये जुन्या रद्द झालेल्या ५०० व १००० च्या नोटांच्या भरवशावर कर भरण्याची सवलत दिल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात दोन नगर पालिकांसह १० नगर पंचायतीत एकूण २९ लाख ५१ हजार १४० रूपयांचा कर एकाच दिवशी नागरिकांकडून वसूल करण्यात आला.
जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या गडचिरोली नगर पालिकेत शुक्रवारी सकाळी १० वाजतापासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ७ लाख १ हजार १२६ रूपयांची वसुली कराच्या रूपाने झाली. यामध्ये गृह/मालमत्ता करापोटी ५ लाख ३६ हजार १०३ रूपये, पाणीपट्टी करापोटी १ लाख ६५ हजार २३ रूपये वसूल करण्यात आले. रात्री सुध्दा कर वसुलीचे काम सुरू राहणार असल्याचे पालिकेच्या कर विभागाचे निरिक्षक सुरेश भांडेकर यांनी लोकमतला सांगितले.
जिल्ह्यातील सर्वात जुनी नगर पालिका असलेल्या देसाईगंज येथे सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकत्रीत मालमत्ता कर २ लाख ५० हजार ६४१ रूपयांच्या कराची वसुली करण्यात आली. यात गाळे भाडे ४२०९४, पाणीपट्टी कर १ लाख १४ हजार ९५० असा एकूण ४ लाख ७ हजार ६८५ रूपयांचा भरणा करण्यात आला. मध्यरात्री १२ वाजेपर्यंत कर भरण्याची प्रक्रिया सुरूच राहणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी तैमूर मुलानी यांनी लोकमतशी बोलताना दिली.
एटापल्ली नगर पंचायतीत सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ३७ हजार ४८२ रूपयांची वसुली नागरिकांकडून करण्यात आली. नगराध्यक्ष सरीता प्रसाद राजकोंडावार, सुशिल कोकणी यांच्या मार्गदर्शनाखाली न.पं.चे कर्मचारी आर. एम. येरमे, के. एन. कागदेलवार, व्ही. जी. मोहुर्ले, पी. टी. कपाटे, एल. टी. दुर्गे, आर. एम. गर्गम यांनी घरोघरी जाऊन कर वसुली केली. या संपूर्ण रक्कमेत नागरिकांकडून रद्द झालेल्या ५०० व १००० च्या नोटा मिळाल्या. कर मोहीम वसुलीच्या वेळी नगर पालिकेतर्फे लाऊडस्पीकर लावून नागरिकांना कर भरण्याबाबत आवाहन करण्यात आले. विशेष म्हणजे, चार ते पाच हजारांची वसुली होत असते. मात्र शुक्रवारी एकाच दिवशी ४० करदात्यांनी कराचा भरणा केला.
सिरोंचा नगर पंचायतीत एकाच दिवशी ४४ हजार ६६८ रूपयांची वसुली दुपारी ४ वाजेपर्यंत करण्यात आली.
भामरागड नगर पंचायतीत शुक्रवारी ७ हजार ८३० रूपयांची कर वसुली झाली. सकाळी १० वाजतापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे काम चालले. शहरात ध्वनीक्षेपक फिरवून नागरिकांना कर भरणा करण्याबाबत व जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार असल्याचीही माहिती देण्यात आली होती.
मुलचेरा नगर पंचायतीत सायंकाळी ५ वाजेपर्यंत ३० हजार ४५० रूपयांची कर वसुली झाली. येथे कर वसुलीला गुरूवारपासून प्रारंभ करण्यात आला. शुक्रवारी रात्री ११ वाजेपर्यंत ४० हजारांच्या आसपास कर वसुली होईल, अशी माहिती मुख्याधिकारी समशेर पठाण यांनी दिली.
धानोरा नगर पंचायतीत शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ११ हजार ५७३ रूपयांची वसुली झाली होती. यामध्ये पाणीपट्टी कर २ हजार २८३, मालमत्ता कर ९ हजार २९० रूपये वसूल करण्यात आला.
कुरखेडा येथे शुक्रवारी सकाळपासून ८० हजार रूपयांची कर वसुली करण्यात आली. न.पं.ची दैनंदिन सरासरी कर वसुली ५ ते ७ हजार रूपये राहते. मात्र ५०० व १००० च्या नोटा स्वीकारण्यात आल्याने रात्री १२ वाजेपर्यंत कर भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे, अशी माहिती नगरसेवक अ‍ॅड. उमेश वालदे, वसुली कारकून नामदेव कोसरे, देविदास देशमुख, रोशन मेश्राम यांनी दिली.
आरमोरी नगर पंचायतीत मालमत्ता व पाणी कराची शुक्रवारी ४ लाख ५९ हजार ७२८ रूपयांची वसुली करण्यात आली. १००० च्या २१० नोटा तर ५०० च्या ४८७ नोटा सायंकाळी ६ वाजेपर्यंत जमा झाल्या होत्या. आरमोरीत मालमत्ता करापोटी ४ लाख ७ हजार ९७८ तर पाणी पट्टी कराचे ४५ हजार रूपये वसूल करण्यात आले.
कोरची येथे नगर पंचायतीकडे सायंकाळी ६ वाजेपर्यंत १ लाख ४५ हजार ५९४ रूपयांचा कर जमा करण्यात आला.
अहेरी नगर पंचायतीत दिवसभरात ३ लाख ३ हजार १०४ रूपयांचा कर वसूल करण्यात आला. यामध्ये एक हजाराच्या ८३ नोटा व ५०० च्या ३६६ नोटा स्वीकारण्यात आल्या. या करामध्ये चाळकर, आठवडी बाजार वसुलीही घेण्यात आली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ३ लाख ३ हजार १०४ रूपये जमा झाले होते. येथे रात्री १२ वाजेपर्यंत कर वसुलीचे काम सुरू राहणार होते.
चामोर्शी नगर पंचायतीत दिवसभरात ७ लाख २२ हजार रूपयांचा कर वसूल करण्यात आला. रात्री उशीरापर्यंत कर वसुलीतून जमा झालेल्या रक्कमेचा हिशोब जोडण्याचे काम मुख्याधिकारी अर्शीया जुही यांच्या नेतृत्वात युध्दपातळीवर सुरू होते. (प्रतिनिधी)

Web Title: Tax collection of 29 lakh 51 thousand on one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.