टॅक्सी चालकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:03 AM2017-11-15T00:03:33+5:302017-11-15T00:03:47+5:30

छत्तीसगड राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात येणाºया खासगी ट्रॅव्हल्स व पांढºया रंगाच्या गाड्या राजरोसपणे प्रवासी वाहतूक करीत आहेत.

Taxi drivers hit the collector's office | टॅक्सी चालकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

टॅक्सी चालकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : छत्तीसगड राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात येणाºया खासगी ट्रॅव्हल्स व पांढºया रंगाच्या गाड्या राजरोसपणे प्रवासी वाहतूक करीत आहेत. या प्रकाराला तत्काळ आळा घालावा, या मागणीकरिता मंगळवारी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा टॅक्सी युनियनचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या नेतृत्वात काळी-पिवळी टॅक्सीचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले.
इंदिरा गांधी चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. या मोर्चात शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार, महिला आघाडी जिल्हाप्रमुख छायाताई कुंभारे, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख संतोष मारगोनवार, उपजिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, राजू कावळे, घनश्याम कोलते, अविनाश गेडाम, पप्पी पठाण, विलास ठोंबरे, श्याम धोटे, नईम शेख, शब्बीर पठाण, नीतेश कुळमेथे, बाबा शेख, अजय नेवारे, यशवंत देशमुख, विनोद गनभोयर, एजाज पठाण, क्रिष्णा उईके, धनंजय सहारे, नजीद शेख, होमराज गायकवाड, बाबा भाई, राजा पठाण, कोरची येथील सुभाष बरोठे, विजय घाडगे, जितेंद्र शेंदरे, पंकज वालदे, हिरेंद्र घोर यांच्यासह जय महाराष्ट्र काळी-पिवळी टॅक्सी युनियनचे शेकडो टॅक्सी चालक व मालक सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यानंतर जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.
मागील काही दिवसांपासून रायपूर ते राजनांदगाव, देवरी, कोरची, कुरखेडा, देसाईगंजमार्गे, तसेच नागपूरकडे चार ट्रॅव्हल्स चालविल्या जात आहेत. शिवाय चामोर्शी, आष्टी, अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, भामरागडकडे ट्रॅव्हल्सद्वारे प्रवासी वाहतूक केली जात आहे. धानोरा मार्गावरही काही पांढºया रंगाच्या वाहनांमधून अवैधरित्या प्रवासी वाहतूक केली जात आहे. यामुळे जिल्ह्यातील ४०० ते ५०० काळी-पिवळी टॅक्सी चालक व मालक अडचणीत आले आहेत. छत्तीसगड पासिंगच्या ट्रॅव्हल्स व पांढºया गाड्यांवर निर्बंध लावून जिल्ह्यातील सरकारी परवाना असलेल्या काळी-पिवळी टॅक्सीचालक व मालकांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

Web Title: Taxi drivers hit the collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.