चातगावात टॅक्सीचालकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 11:59 PM2017-12-13T23:59:17+5:302017-12-13T23:59:32+5:30
धानोरा पार्इंटवरून अवैध प्रवाशी वाहतूक करणाºया सफेद गाड्यांवर प्रतिबंध घालावे या मागणीसाठी गडचिरोली-धानोरा मार्गावरील चातगाव येथे बुधवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : धानोरा पार्इंटवरून अवैध प्रवाशी वाहतूक करणाºया सफेद गाड्यांवर प्रतिबंध घालावे या मागणीसाठी गडचिरोली-धानोरा मार्गावरील चातगाव येथे बुधवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनानंतर पोलीस विभागाच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, सफेद गाड्यांना मार्गावर प्रवाशी वाहतूक करण्याची परवानगी नाही. तरीही उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलीस विभागाच्या पाठबळामुळे सफेद गाड्यांमध्ये प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे काळीपिवळी टॅक्सीचालकांना प्रवाशी मिळणे कठीण झाले आहे. काळीपिवळी चालकांना वर्षाला ६० ते ७० हजार रूपये शासनाकडे भरावे लागतात. एवढी मोठी रक्कम कुठून भरावी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पेंढरी येथे काळीपिवळी चालकांना प्रवाशी भरण्यास प्रतिबंध केला जात आहे. सफेद वाहनांना प्रवाशी वाहतुकीची अवैध परवानगी दिल्याने काळीपिवळी चालक व सफेद वाहनचालकांमध्ये अनावश्यक वाद निर्माण झाले आहेत. या वादातूनच धानोरा येथे काळीपिवळी चालकावर कुºहाडीने वार करण्यात आला. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलिसांना सफेद वाहनधारकांचा एवढाच पुडका असेल तर ज्या मार्गावरून काळीपिवळी वाहने चालत नाही, अशा मार्गावर सफेद वाहने चालविण्यास परवानगी द्यावी आदी मागण्यांसाठी चातगाव येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात काळीपिवळी टॅक्सीचालक-मालक संघटनेचे अध्यक्ष रमेश मडावी, महासचिव राकेश धकाते, जयेश क्षिरसागर, हिरालाल राऊत, गणेश बुरांडे, मनोज जम्बेवार, संजय जम्बेवार, विजय बारापात्रे आदी सहभागी होते.