११० वर शिक्षकांचे समायोजन
By admin | Published: March 27, 2017 12:48 AM2017-03-27T00:48:56+5:302017-03-27T00:48:56+5:30
सप्टेंबर २०१६ मध्ये करण्यात आलेल्या संच मान्यतेनुसार विषय शिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापकांचे यापूर्वी समायोजन करण्यात आले.
जि.प.त गर्दी : बंगाली माध्यमाच्या शाळांतील शिक्षकांना हलविले
गडचिरोली : सप्टेंबर २०१६ मध्ये करण्यात आलेल्या संच मान्यतेनुसार विषय शिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापकांचे यापूर्वी समायोजन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाभरात ४३४ शिक्षकांच्या जागा रिक्त राहिल्या होत्या. या रिक्त जागांवर अतिरिक्त झालेल्या २८३ शिक्षकांना समायोजन प्रक्रियेसाठी रविवारी बोलविण्यात आले. त्यापैकी सायंकाळी उशीरापर्यंत ११० वर शिक्षकांचे समायोजन करण्यात आले.
धानोरा, गडचिरोली, सिरोंचा, अहेरी, कुरखेडा, मुलचेरा या तालुक्यातील मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. त्यानंतर बंगाली माध्यमाच्या शाळेतील मराठी भाषिक शिक्षकांना मराठी माध्यमाच्या शाळेत समायोजन करण्यात आले. सदर समायोजन प्रक्रियेसाठी रविवारी सुटीच्या दिवशी जिल्हाभरातील शिक्षकांनी जिल्हा परिषदेत गर्दी केली होती. रात्री उशीरापर्यंत मुलचेरा, चामोर्शी तालुक्यातील बंगाली व हिंदी माध्यमातील शाळांमधील शिक्षकांची समायोजन प्रक्रिया सुरू होती. (स्थानिक प्रतिनिधी)