शाळा सुंदर बनविण्यास जिल्ह्यात गुरूजी उदासीन; ४७३ शाळांनी अद्याप नोंदणीही केली नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 03:31 PM2024-08-23T15:31:03+5:302024-08-23T15:32:39+5:30
Gadchiroli : ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधी दरम्यान नोंदणी करणे आवश्यक
दिगांबर जवादे
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान मागील वर्षीच्या सत्रापासून सुरू करण्यात आले. मागील वर्षी या अभियानाला शाळांनी चांगला प्रतिसाद दर्शवल्यानंतर यावर्षीही सदर अभियान राबवले जात आहे. ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधी दरम्यान शाळांनी त्यांच्या शाळांमध्ये असलेल्या सुविधांची माहिती भरायची आहे. मात्र अजूनही सुमारे ४७३ शाळांनी रजीस्ट्रेशनही केलेले नाही. यावरून या शाळा सदर स्पर्धेत सहभागी होण्यास इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा आदी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे, शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे, शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादणूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. या अभियानाची सुरुवात ५ ऑगस्ट रोजी झाली. शेवट ४ सप्टेंबर रोजी होणार आहे. मूल्यांकनाची प्रक्रिया ५ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या कालावधीत पार पाडण्यात येणार आहेत.
सहभाग न घेतलेल्या तालुकानिहाय शाळा
अहेरी - १०२
आरमोरी - २४
भामरागड - २४
चामोर्शी - १२२
देसाईगंज - ३३
धानोरा - २७
एटापल्ली - ३२
गडचिरोली - १७
कोरची - १४
कुरखेडा - ६
मुलचेरा - ३४
सिरोंचा - ३८
बक्षीस जिंकण्याची शाळांना संधी
बक्षीस जिंकण्याची शाळांना संधी तालुक्यावर तालुक्यावर पहिले प बक्षीस ३ लाख, दुसरे दूसर २ २ लाख, लाख, तिसरे तिसर १ लाख, जिल्ह्यावर पहिले ११ लाख, दुसरे ५ लाख, तिसरे ३ लाख तर विभागीय स्तरावर पहिले २१ लाख, दुसरे १५ लाख, तिसरे ११ लाख रुपयांचे पारितोषिके देण्यात येणार आहे.