शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमाेर वाचला समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:26 AM2021-07-18T04:26:28+5:302021-07-18T04:26:28+5:30

निवेदनात नियमित, स्थायी,चटोपाध्याय समितीचे प्रस्ताव, हिंदी मराठी सूट आदींची नोंद सेवापुस्तकात घ्यावी, सर्व शिक्षकांचे वेतन एकस्तरानुसारच काढण्यात यावेत. एकस्तर ...

The teacher read the problem to the authorities | शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमाेर वाचला समस्यांचा पाढा

शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमाेर वाचला समस्यांचा पाढा

googlenewsNext

निवेदनात नियमित, स्थायी,चटोपाध्याय समितीचे प्रस्ताव, हिंदी मराठी सूट आदींची नोंद सेवापुस्तकात घ्यावी, सर्व शिक्षकांचे वेतन एकस्तरानुसारच काढण्यात यावेत. एकस्तर कपात करून चटोपाध्यायनुसार काढू नयेत. वेतन निश्चिती केल्यानंतर त्याबाबत सर्व शिक्षकांना अवगत करावे. शिक्षकांची प्रलंबित वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके व रजाविषयक देयके त्वरित अदा करावी.

डीसीपीएसधारकांच्या पावत्यांच्या हिशेब द्यावा, विद्यार्थी शिष्यवृत्ती व उपस्थिती भत्ता मिळण्याबाबत जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करावा, विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरित करावी, शिक्षण विभागास संगणक व प्रिंटर घेऊन देण्याची कार्यवाही करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश हाेता. शिष्टमंडळात समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष नरेंद्र कोत्तावार, मार्गदर्शक राजेश बाळराजे, संजय लोणारे, तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम पिपरे, सचिव संतोष लाजूरकर, कार्याध्यक्ष ओमप्रकाश साखरे, अनिल मार्तीवार, देवाजी तिम्मा, अनिल बारई, नरेश जाम्पलवार, हरी गेडाम आदी उपस्थित होते.

Web Title: The teacher read the problem to the authorities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.