पोटेगाव आश्रमशाळेत शिक्षक दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:40 AM2021-09-06T04:40:37+5:302021-09-06T04:40:37+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मंगेश ब्राह्मणकर होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे, एस.आर. मंडलवार,डॉ. एस.डी. गोट्टमवार, अधीक्षक ...

Teacher's Day celebrated at Potegaon Ashram School | पोटेगाव आश्रमशाळेत शिक्षक दिन साजरा

पोटेगाव आश्रमशाळेत शिक्षक दिन साजरा

Next

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मंगेश ब्राह्मणकर होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे, एस.आर. मंडलवार,डॉ. एस.डी. गोट्टमवार, अधीक्षक एस.आर. जाधव उपस्थित होते. माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्यावर विचार व्यक्त करीत शिक्षणातूनच आपले जीवन घडविता येते, तसेच व्यक्ती व राष्ट्राचा विकास साधता येताे. राष्ट्रीय व विश्वात्मक एकात्मता शिक्षणाच्याच माध्यमातून निर्माण करता येते. शील व नैतिकतेला धरून संस्कारात्मक जीवन प्रामाणिकपणे जगावे, असे आवाहन केले.

याप्रसंगी मान्यवरांसह विद्यार्थांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन व आभार पदवीधर प्राथमिक शिक्षिका बी.डी. वाळके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्ही.के.नैताम, अरुण कुनघाडकर, प्रशांत बोधे व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला शिक्षकेतर कर्मचारी व इयत्ता ८ ते १० वी विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Teacher's Day celebrated at Potegaon Ashram School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.