शिक्षकांनी काळ्या फिती लावून केले काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:45 AM2021-07-07T04:45:38+5:302021-07-07T04:45:38+5:30
भेंडाळा : गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शासनाकडे ३३ मागण्यांसाठी पाठपुरावा करत आहे. परंतु राज्य सरकारने मागण्यांची ...
भेंडाळा : गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शासनाकडे ३३ मागण्यांसाठी पाठपुरावा करत आहे. परंतु राज्य सरकारने मागण्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे संपूर्ण राज्यातील शिक्षकांसह गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी साेमवारी काळ्या फिती लावून काम करत शासनाचा निषेध केला.
जुनी पेन्शन योजना लागू करून भविष्य निर्वाह निधी योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे, आश्वासित प्रगती योजना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करणे, शिक्षकेतरांच्या पद भरतीबाबतचा निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणे भरती करण्यात यावी, कोरोनाग्रस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना विशेष रजा मंजूर करणे, अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांची मुक्तता करणे आदींसह विविध मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी शिक्षक परिषदेच्या वतीने काळ्या फिती आंदाेलन करण्यात आले.
यावेळी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष संतोष सुरावार, गोपाल मुनघाटे, संतोष जोशी, जी.एच. रहेजा, मनोज बोमनवार, घनश्याम मनबत्तुलवार, गणेश तगरे, देवीदास नाकाडे, मृणाल तुमपल्लीवार, सरिता बंडावार, चंद्रकांत बुरांडे, जानकीराम नन्नावरे, श्यामराव बंडावार, सुनंदा गलबले, पंढरी कोपरे, तसेच जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी, तालुका पदाधिकाऱ्यांनी साेमवारी आपापल्या शाळेमध्ये राज्य शासनाचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून काम केले.
050721\img_20210705_120308.jpg
विश्वशांती विद्यालय भेंडाळा येथील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा अध्यक्ष संतोष सूरावार यांनी शासनाच्या विरुध्द काळ्या फिती लाऊन आंदोलन करतांना.