शिक्षकांचा मोर्चा जि.प.वर धडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:45 AM2019-02-17T00:45:02+5:302019-02-17T00:46:37+5:30
शिक्षकांप्रती वादग्रस्त व विपर्यस्त भाष्य करून शिक्षकांची प्रतिमा डागाळणारे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक यांची बदली गडचिरोली जिल्ह्याबाहेर करून शिक्षकांना न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी शनिवारी सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व शेकडो शिक्षकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शिक्षकांप्रती वादग्रस्त व विपर्यस्त भाष्य करून शिक्षकांची प्रतिमा डागाळणारे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक यांची बदली गडचिरोली जिल्ह्याबाहेर करून शिक्षकांना न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी शनिवारी सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व शेकडो शिक्षकांनी जिल्हा परिषदेवरमोर्चा काढला.
स्थानिक चंद्रपूर मार्गावरील आयटीआय चौकातून शिक्षकांचा मोर्चाजिल्हा परिषद कार्यालयावर धडकला. या ठिकाणी सभा घेण्यात आली. या सभेत शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी वादग्रस्त उपशिक्षणाधिकारी चलाख यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. त्यानंतर जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांमार्फत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना मागणीचे निवेदन पाठविले. यावेळी महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष धनपाल मिसार, प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रघुनाथ भांडेकर, जि.प. कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र डोहणे, प्राथमिक शिक्षक परिषदेचे अध्यक्ष प्रमोद खांडेकर, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अध्यक्ष गुरूदेव नवघडे, पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष यशवंत जांभुळकर, राज्य दुर्गम क्रांती संघटनेचे अध्यक्ष किशोर कुरवटकर, विदर्भ शिक्षक समितीचे अध्यक्ष लालचंद धाबेकर, केंद्र प्रमुख शिक्षक सभेचे अध्यक्ष राजू वडपल्लीवार, जि.प.कास्ट्राईब कल्याण महासंघाचे अध्यक्ष विजय बन्सोड, राष्टÑवादी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विनोद ब्राह्मणवाडे, पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विलास म्हस्के आदीसह जिल्हाभरातील शेकडो शिक्षक या मोर्चात सहभागी झाले होते.
शिक्षणाधिकाºयांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली तालुक्याच्या गिलगाव येथे आयोजित शालेय बाल क्रीडा व कला संमेलनाच्या उद्घाटनिय सोहळ्यात उपशिक्षणाधिकारी मारोती चलाख यांनी व्यासपीठावरून शिक्षकाप्रती अपमानजनक वक्तव्य केले. याप्रकरणी जि.प. सीईओंनी सुनावली घेतली. यात मारोती चलाख यांच्याकडून मानखंडना झाल्याचे सिध्द होऊनही त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे शिक्षक संवर्गात असंतोष पसरला आहे.