शिक्षकांनी विद्यार्थ्यांची बोलीभाषा समजून घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 01:07 AM2018-09-03T01:07:05+5:302018-09-03T01:08:41+5:30

गडचिरोली जिल्ह्यात पाचपेक्षा अधिक बोलीभाषा बोलल्या जातात. पहिली ते चवथीच्या काही विद्यार्थ्यांना मराठी भाषा समजत नाही. अशा विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांंनी त्यांच्या बोलीभाषेतून संवाद साधत मराठी भाषेतून अध्यापन करावे. यासाठी शिक्षकांना बोलीभाषेची पुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील, .....

Teachers should understand the dialect of students | शिक्षकांनी विद्यार्थ्यांची बोलीभाषा समजून घ्यावी

शिक्षकांनी विद्यार्थ्यांची बोलीभाषा समजून घ्यावी

Next
ठळक मुद्देडीआयईसीपीडीची चिंतन बैठक : शिक्षण विभागातील समस्यांवर प्राचार्यांनी केली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात पाचपेक्षा अधिक बोलीभाषा बोलल्या जातात. पहिली ते चवथीच्या काही विद्यार्थ्यांना मराठी भाषा समजत नाही. अशा विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांंनी त्यांच्या बोलीभाषेतून संवाद साधत मराठी भाषेतून अध्यापन करावे. यासाठी शिक्षकांना बोलीभाषेची पुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील, असा निर्णय जिल्हा शैक्षणिक व्यावसायिक विकास संस्थेच्या विभागीय चिंतन कार्यशाळेत घेण्यात आला.
नागपूर विद्या प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या जिल्हा शैक्षणिक व्यावसायिक विकास संस्थांची विभागीय चिंतन कार्यशाळा गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्रादेशिक विद्या प्राधिकरणच्या प्रा. मनीषा भडंग, प्राचार्य रवींद्र रमतकर, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. विनित मत्ते, डॉ. अपर्णा शंखदरवार, प्राचार्य किरण धांडे, अधिव्याख्याता मंजुषा ओंडेकर, भंडाराच्या प्राचार्य राधा अतकरी, अधिव्याख्याता अभय परिहार, चंद्रपूरचे प्राचार्य धनंजय चापले, जनार्धन कापसे, संतोष ठाकूर, राजकुमार हिवारे, गडचिरोली संस्थेचे प्राचार्य डॉ. शरदचंद्र पाटील, पांडुरंग चव्हाण, मिलींद अघोर आदी उपस्थित होते.
या कार्यशाळेत अध्ययन निष्पत्ती, केंद्रप्रमुखांचे सक्षमीकरण करणे, सीआरजी, बीआरजी सदस्य, शिक्षण विस्तार अधिकारी गटशिक्षणाधिकारी या पर्यवेक्षिय यंत्रणेला योग्य प्रशिक्षण देऊन त्यांचे सक्षमीकरण करणे, जिल्हा परिषद शाळांबरोबरच महानगर पालिका, नगर परिषदेच्या शाळांचाही दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणे.
गडचिरोली जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांना पायाभूत अंक ज्ञानसुद्धा नाही. त्यामुळे गणिताच्या पुढील क्रिया करताना अडचण निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांच्या पायाभूत क्षमता विकसित करण्यासाठी गडचिरोली डीआयईसीपीडी संस्था कोणते प्रयत्न करीत आहे. याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
प्रास्ताविक पांडुरंग चव्हाण, संचालन विषय सहायक कुणाल कोवे यांनी केले तर आभार संजय बीडवाईकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी डीआयईसीपीडीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Teachers should understand the dialect of students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.